"त्या पैंजण पुरून टाकलेल्या जागेवरच हे वडाचं झाड उगवलंय. नक्कीच!"

खातरजमा करून घेण्यासाठी राकेश पटकन उठला. घरात झोपलेल्या नातेवाईकांकडे नजर टाकत त्याने हळूच घराचा दरवाजा उघडला. दरवाजाच्या कर्र कर्र आवाजामुळे त्याच्या मनावर भितीचा आणखी एक थर पांघरला गेला. चांदण्याच्या प्रकाशात ते वडाचं झाड अक्राळविक्राळ वाटत होतं. राकेशला पुढे पाऊल टाकायचा धीर होईना. दरवाजा लावून घेण्यासाठी तो मागे सरकला आणि त्या झाडाच्या खोडातून त्याला संगीताचा चेहेरा त्याच्याकडे पाहून हसताना दिसला.

खडाखडा मान हलवून आपल्याला भास तर झाला नाही ना, याची खात्री त्याने करून घेतली.

नाही! तो भास नव्हता!!

संगीताचा चेहेरा अजूनही त्या वडाच्या झाडाच्या खोडातून त्याच्याकडे पाहात दात विचकून हसत होता. वडाच्या पारंब्या कसला तरी उत्साह आल्यासारख्या वळवळत होत्या. राकेश अक्षरश: मुळापासून हादरला.

"इथे राहाणं धोक्याचं आहे. पळ! स्वत:ला वाचव!" त्याच्या मनाने धोक्याची घंटा वाजवली.

Te Vadache Jhaad Horror Mystery Thriller on मोगरा फुलला - मराठी कथांचा ब्लॉग

हा फास आपण सोडवू शकणार नाही हे त्याला कळलं होतं. कसेबसे त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले.

"म...ला.. मा...फ..."

" आऽक्‌... !" गळ्यावरचा दाब आणखी वाढला.

आपले डोळे बाहेर येतायंत असं त्याला वाटत असतानाच तो त्या वडाच्या झाडाच्या दिशेने फरफटला जात होता. रस्त्यातले दगड, धोंडे त्याच्या डोक्याला लागत होते, धुळीने त्याचं सर्वांग माखलं होतं. त्यात त्याच्या डोक्यातल्या जखमांचं रक्त मिसळलं होतं. अचानक जमीनीचा आधार सुटून आपण हवेत लटकतो आहोत अशी त्याला जाणीव झाली. पण खाली पहायला त्याची मान मोकळी होतीच कुठे?

आता तो पुन्हा त्या झाडाच्या खोडासमोर होता. यावेळेस खूप जवळून पहायला मिळालं ते खोड. झाडाच्या खोडातला संगीताचा चेहेरा पुन्हा त्याच्याकडे पाहून दात विचकत हसला आणि गळ्याभोवती घट्ट बसलेल्या पारंबीने आपला फास करकचून आवळला.

कऽच्!

एका दळभद्र्या अस्तित्वाचा शेवट झाला होता.

तांबडं फुटलं, कोंबड्यांने बांग दिली. पक्षी आपल्या घरट्यांतून बाहेर पडले. चिमण्या, कावळे कधी नव्हे ते आज त्या वडाच्या झाडावर बसून आपल्या सवंगड्यांना बोलावत होते. पारंब्यांच्या जाळ्यात लटकणारं राकेशचं प्रेत त्यांच्या लक्षात येणार होतं का?


----- समाप्त -----

----- या कथेवरील अभिप्राय / प्रतिक्रिया येथे नोंदवाव्यात. -----

Share this post:

5 comments

 1. Kanchan Karai // June 15, 2012 at 10:27 AM  

  ते वडाचं झाड या कथेचे आठवे व शेवटचे पान दि. १५ जून २०१२ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ठीक १०:२५ वाजता प्रकाशित केले आहे.

 2. Sourav Sutar // August 5, 2013 at 6:54 AM  

  Rajesh ani Rakesh madhilfarak sangava
  vadach zad aadich varshat kaskay tithech paranbyasahit moth zal BAKI TUMCHI KATHA KHUP CHHAN AHE

 3. Kanchan Karai // August 16, 2013 at 5:24 PM  

  @ Sourav Sutar, राजेश व राकेश ही दोन निरनिराळ्या कथांमधील पात्रं आहेत. दोघांचा उल्लेख एकाच कथेमधे झाला असेल, तर ती त्रूटी आहे. कृपया पान क्रमांक सांगावे म्हणजे दुरूस्ती करता येईल. प्रतिक्रियेसाठी आभार.

 4. aruna // June 17, 2014 at 5:41 PM  

  you write good story.

 5. Kanchan Karai // June 18, 2014 at 6:51 AM  

  Thank you Aruna Tai.

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------