स्सळ्‌ळ.... स्सळ्‌ळ.... स्सळ्‌ळ.... स्सळ्‌ळ.... !

झाडांच्या पानांचा आवाज झाला आणि राकेश भानावर आला. भूतकाळात त्याच्या हातून घडलेलं पाप! आज निवांत वेळ मिळाल्यामुळे त्याला त्यातला क्षण न्‌ क्षण आठवायला फुरसत मिळाली होती. एरव्ही शहरातल्या मौजमजेत हे सर्व कुठनं आठवणार त्याला?

Te Vadache Jhaad Horror Mystery Thriller on मोगरा फुलला - मराठी कथांचा ब्लॉग

छन्‌...!

डोळे मिटतायंत असं वाटत असतानाच राकेश पुन्हा सावध झाला.

"कसला आवाज होता तो...? ...नाही, बहुधा भास झाला."

छन्‌... छन्‌... छन्‌...!

आता मात्र राकेश ताडकन्‌उठून बसला. भास नव्हता तो. कुणाच्या तरी पायातले पैंजण...?

"पैंजण...?!" ती पैंजण पुरलेली जागा!!! ती गोष्ट राकेशला आठवली आणि त्याला दरदरून घाम फुटला.

संगीताच्या प्रकरणात त्याने कोणताच पुरावा मागे ठेवला नव्हता पण तिच्या पायतलं पैंजण, ते मात्र तिचा पाय ओढून खाली पाडताना त्याच्या हातात आलं होतं. तेव्हा त्याने ते झटकन पॅन्टच्या खिशात टाकलं होतं. त्याची विल्हेवाट लावावी म्हणून घरासमोरच्या मोकळ्या जागेत एक खड्डा खणून त्याने ते पैंजण पुरून टाकलं होतं.

Share this post:

1 comments

  1. Kanchan Karai // June 14, 2012 at 9:23 AM  

    ते वडाचं झाड या कथेचे सातवे पान दि. १४ जून २०१२ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ठीक ९:२० वाजता प्रकाशित केले आहे.

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------