इथे मात्र तिला दुर्दैव आड आलं. राकेशने बरोबर लक्ष ठेवून तिचा पाय आपल्या हातात धरला आणि तिला खाली पाडलं. संगीता हात-पाय झाडत होती. राकेशने तिचे दोन्ही हात घट्ट धरून ठेवले, तशी संगीताने पुन्हा ओरडण्यासाठी तोंड उघडलं. राकेशने तिच्या तोंडावर हात दाबेपर्यंत तिच्या तोंडून अस्पष्टशी किंकाळी बाहेर पडलीसुद्धा!

Te Vadache Jhaad Horror Mystery Thriller on मोगरा फुलला - मराठी कथांचा ब्लॉग
मिरवणूकीचे आवाज पुन्हा त्याच्या कानात घुमू लागले. मिरवणूक परतायला वेळ होता पण त्यापूर्वी त्याला बरंच काही करायचं होतं. तो सावधपणे त्या घराबाहेर पडला. सावधपणे, लपतछपत स्वत:च्या घरी गेला. घरात जाऊन त्याने पुन्हा मिरवणुकीतले गुलालाने भरलेले कपडे घातले. शर्टाच्या खिशातला गुलाल थोडा चेहेर्‍याला, हाता-पायाला लावून घेतला आणि तो वाट पहात राहिला मिरवणुक पुन्हा कधी परतते याची. मिरवणुक त्याच्या घराजवळ जवळ आली. तो अगदी सहजपणे गर्दीत मिसळला. कुणाच्या तरी हातनं गुलाल घेऊन त्याने स्वत:चा चेहेरा गुलालाने आणखीन माखून घेतला, ओळखू न येण्याइतपत आणि मग बेभानपणे नाचत राहिला देवीचा जयजयकार करत.


Share this post:

1 comments

  1. Kanchan Karai // June 13, 2012 at 10:11 AM  

    ते वडाचं झाड या कथेचे सहावे पान दि. १३ जून २०१२ रोजी, भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ठीक १०:०८ वाजता प्रकाशित केले आहे.

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------