गणूमामाच्या घराचा दरवाजा आता बंद होता. दरवाजावर टकटक केल्यावर संगीता दरवाजा उघडणार हे उघड होतं. दरवाजाची कडी वाजवून तो मुद्दाम कडेला उभा राहिला म्हणजे संगीताने फटीतून पाहिलं असतं तरी तिला समोर कुणी दिसलं नसतं. त्याच्या अपेक्षेप्रमाणे तसंच झालं. कडी वाजवल्यानंतर संगीता दरवाजाजवळ आली. पायात पैंजण घातले होते तिने बहुधा. 'छन्‌ छन्‌' असा आवाज येत होता. तिने फटीतून बाहेर कोण आहे याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. पण कुणीच दिसत नाही म्हटल्यावर थोडा वेळ थांबून तिने दरवाजा उघडला.

Te Vadache Jhaad Horror Mystery Thriller on मोगरा फुलला - मराठी कथांचा ब्लॉगघुसमटण्याचं तिने केवळ नाटक केलं होतं. राकेश तिला जवळ ओढत असतानाच तिने चपळाईने आपला गुडघा गपकन्‌ त्याच्या पोटात मारला.

राकेशच्या पोटातून एक असह्य कळ आली. तो खाली वाकला. आपली लाथ बरोबर बसलेली पाहून संगीताने आणखी एक लाथ मारण्यासाठी पाय उचलला.

Share this post:

1 comments

  1. Kanchan Karai // June 12, 2012 at 8:04 AM  

    "ते वडाचं झाड" या कथेचे पाचवे पान दि. १२ जून २०१२ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ठीक ८:०० वाजता प्रकाशित केले आहे.

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------