"याला म्हणतात नशीब!" राकेश स्वत:शीच म्हणाला.

राकेशने सकाळपासून पाळत ठेवली होती गणूमामाच्या घरावर. सावित्रीमामीला मिरवणूकीला पाठवून संगीताला घरात थांबवण्यासाठी त्याने एक चांगला प्लान बनवला होता. पण त्याची गरजच पडली नाही. मिरवणूकीच्या धामधूमीत परक्याच्या तरण्याताठ्या पोरीला कुठे घेऊन जायचं, असा विचार करून सावित्रीमामीने संगीताला घरीच थांबायला सांगितलं. संगीता तशीदेखील कामाशिवाय घराबाहेर पडत नसे, तिला मिरवणूकीला जायला न मिळाल्याचं काहीच वाईट वाटलं नाही. आधीच्या दोन दिवसांत जत्रेत फिर-फिर फिरली होती ती. रंगीत बांगड्या, खड्याच्या टिकल्या, रिबिनी, छन्‌ छन्‌ आवाज करणारे पैंजण. सगळं सामान तसंच बांधून ठेवलं होतं. मामा-मामी मिरवणूकीला गेले की ते सर्व सामान काढून ती डोळे भरून पहाणार होती. जमलंच तर पैंजण घालून घरभर नाचून पहाणार होती. पण तिच्या या छोट्या छोट्या स्वप्नांचा चक्काचूर करायला एक राक्षस टपून बसला होता, हे कुठे तिला माहित होतं?

Te Vadache Jhaad Horror Mystery Thriller on मोगरा फुलला - मराठी कथांचा ब्लॉग ते वडाचं झाड - पान ४दिसेनाशी झाली. वाद्यांचे आवाज अस्पष्ट होऊ लागले. रस्त्यावर जी काय एक-दोन माणसं मिरवणूक पहात होती, ती देखील आपापल्या घराच्या दिशेने निघून घेली. तसा राकेश
सावकाश, सावधपणे पावलं टाकत गणूमामाच्या घराच्या दिशेने जाऊ लागला.

Share this post:

3 comments

  1. Kanchan Karai // June 8, 2012 at 8:13 AM  

    "ते वडाचं झाड" या कथेचे चौथे पान दि. ८ जून २०१२ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ठीक ८:१२ वाजता प्रकाशित केले आहे.

  2. mau // June 9, 2012 at 9:20 PM  

    mast....lavakar yeu de pudhil bhag.

  3. Kanchan Karai // June 9, 2012 at 9:37 PM  

    धन्यवाद माऊ. पुढचे भाग पुढच्या आठवड्यात पोस्ट करतेय.

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------