राकेशने दोन-तीनदा काहीतरी निमित्त काढून तिच्याशी बोलण्याचादेखील प्रयत्न केला पण तिने दाद दिली नाही. संगीता राकेशच काय, पण गावातल्या कुठल्याच तरूणाकडे मान वर करून पहायची नाही. तसं सावित्रीमामीचं लक्ष असायचं तिच्यावर पण आता पाणी भरायला गेल्यावर मामी काय तिच्या मागे-मागे थोडीच जाणार होती? पण स्वत:च्या रूपाची जाण लवकर आली होती संगीताला. राकेशला तिने चार हात लांब न ठेवलं तरच नवल! त्यामुळेच तिने दिलेल्या थंड प्रतिसादामुळे राकेश खूप भडकला.

Te Vadache Jhaad Horror Mystery Thriller on मोगरा फुलला - मराठी कथांचा ब्लॉग

गणूमामाची आई, बायजाबाय आता खूप म्हातारी झाली होती. दिसणं बंद झालेलं, वाचा बंद झालेली. घरात फिरत असली तरी वार्‍यासोबत कापसासारखी उडून जाईल की काय, असं वाटायचं. ती आता जगली काय न्‌ मेली काय, सारखंच होतं. ती जत्रेला जाणं शक्यच नव्हतं. दरवर्षी तिच्या देखभालीसाठी तीची सून, म्हणजे संगीताची मामी, सावित्री घरातच थांबायची.

"असं काय करता येईल की यावर्षी सावित्रीमामी गणूमामासोबत जाईल जत्रेला आणि मग मला..." राकेशच्या डोक्यात हळूहळू खुनशी बेत तयार होऊ लागला होता.

Share this post:

1 comments

  1. Kanchan Karai // June 7, 2012 at 7:54 AM  

    "ते वडाचं झाड" या कथेचे तिसरे पान आज दि. ७ जून २०१२ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ठीक ७:५० वाजता मुंबई, महाराष्ट्र, भारत येथून प्रकाशित केले आहे.

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------