तसं काही वाईट नव्हतं ते झाड. चांगलं डेरेदार होतं. त्याच्या सावलीमुळे त्या जागेतही गारवा निर्माण होत होता. आजूबाजूची जागा साफसूफ केली तर दुपारच्या काहीलीमधे निवांत झोप घेण्यासाठी चांगली सोय झाली असती. पण राकेशला ते झाड नाहीच आवडलं. आणखी एक गोष्ट त्याच्या लक्षात आली की या झाडापासून काही अंतरावर आंबा, जांभूळ यासारखी इतरही बरीच झाडं होती पण त्या झाडांवर जसे पक्षी बसले होते, तसे या वडाच्या झाडावर काही दिसले नाही. अगदी एखादा कावळा उडतानाही या झाडाला बगल देऊनच उडत असे. त्या वडाच्या झाडाबद्दल वाईट मत बनायला राकेशला हे आणखी एक कारण मिळालं.

Te Vadache Jhaad Horror Mystery Thriller on मोगरा फुलला - मराठी कथांचा ब्लॉग

राकेश नकळत भूतकाळात गेला...

संगीता! तीन वर्षापूर्वी तो गावी असताना त्याने पहिल्यांदाच तिला पाहिलं होतं. गावातला एकमेव सुतार गणूमामा, त्याची भाची होती ती. परिक्षा संपल्यावर सुटीत मामाकडे रहायला आली होती. एकटीच! संगीता होती सोळा वर्षांचीच पण उफाड्याचा बांध्यामुळे दिसायची वीस बावीस वर्षांच्या तरूणीसारखी. हापशाच्या नळावर पाणी भरत असली तर तरणेताठे सोडा, म्हातारे कोतारे सुद्धा टक लावून पहात रहायचे. मग राकेश त्याला अपवाद कसा असेल? तिने एकदा तरी आपल्याकडे पाहून हसावं म्हणून राकेश दोन-तिनदा तिच्यासमोरून गेला पण शून्यात पहात आहोत असं भासवत ती निघून गेली.

Share this post:

1 comments

  1. Kanchan Karai // June 6, 2012 at 8:12 AM  

    "ते वडाचं झाड" या कथेचे दुसरे पान आज दि. ६ जून २०१२ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ठीक ९:१० वाजता मुंबई, महाराष्ट्र, भारत येथून प्रकाशित केले आहे.

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------