खूपदा टाळूनही आज पुन्हा गावी जाण्याची वेळ आपल्यावर आली, म्हणून राकेश थोडया अनिच्छेनेच सामानाची बांधाबांध करत होता. गाव सोडून नोकरीसाठी शहरात आल्यानंतर फक्त एकदा तो गावी गेला होता. तीही भेट ओझरतीच. आईने डोक्यावरून हात फिरवून चार-चारदा सांगितलं, "लेकरा, दर महिन्याला नाही पण सहा महिन्यातून एकदा तोंड दाखवत जा रे बाबा." तिला तोंडावर ’हो’ म्हणून राकेशने शहराचा रस्ता धरला होता. कामाच्या गडबडीत गावी जायला त्याला वेळ मिळाला नाही, असं नाही पण शहरी जीवनाची Te Vadache Jhaad Horror Mystery Thriller on मोगरा फुलला - मराठी कथांचा ब्लॉग जाणवला, तो म्हणजे त्याच्या घरासमोर वाढलेलं वडाचं झाड. केवळ अडीच वर्षांत इथे एक वटवृक्ष कसा काय आला, हे त्याला कळेचना! अडीच वर्षांपूर्वी जेव्हा तो इथून गेला होता, तेव्हा घरासमोर खुरटी झुडुपं वाढलेली जागा होती. गाईगुरं, शेळ्या-बकर्‍या तिथे काहीबाही चरत असायच्या. एखादं कुत्रं झुडुपावर पाय वर करत असायचं. लहानपणापासून पाहिलेल्या या दृश्याची प्रतिमा राकेशच्या मनात व्यवस्थित उमटलेली होती पण या नवीन वडाच्या झाडाने त्याला ही प्रतिमाच पुसून टाकायला लावली. कदाचित त्यामुळेच असेल पण त्याला हे वडाचं झाड अजिबात आवडलं नाही.

Share this post:

1 comments

  1. Kanchan Karai // June 5, 2012 at 9:03 AM  

    "ते वडाचे झाड" या कथेचे पहिले पान आज दि. ५ जून २०१२ रोजी सकाळी ठीक ९:०० वाजता मुंबई, महाराष्ट्र, भारत येथून प्रकाशित केले आहे.

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------