पान २
"एक करता येईल. मोईच्या मैत्रीणींकडून ही बातमी काढता येईल की तिचं कुणावर प्रेम आहे की नाही. पण आपल्या उद्देशाची खबरबात मोई किंवा तिच्या मैत्रीणींना लागायला नको." हुनने म्हटलं.
"एकदमच सोपं आहे हे. मी उद्याच सकाळी माझ्या खाजगी हेराला मोई आणि तिच्या मैत्रीणींची माहिती काढायला पाठवतो."
"धन्यवाद मित्रा! माझ्या कामासाठी तू तुझ्या खाजगी हेराला माझ्या कामासाठी कामाला पाठवणार? तू मला खूपच मदत करतो आहेस." हुनने आनंदून म्हटलं.
"अरे म्हणतात ना, युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ असतं." योह ने हसत हसत हुन च्या पाठीवर थाप मारली आणि दोघेही राजवाड्यात जाण्यासाठी निघाले.
*********

पाणी भरत असताना मोईच्या हातांची होणारी लयबद्ध हालचाल, खाली वाकल्यामुळे गालावर आलेल्या बटा, हसताना विलग झालेल्या ओठांतून दिसणारी मोत्यांसारखी दंतपंक्ती, हे पाहून हुन अगदी वेडापिसा झाला. असंच धावत जावं आणि मोईला आपल्या बाहुपाशात घ्यावं असं त्याच्या मनात येऊन गेलं. पण तसं करणं त्याच्या सभ्यतेला शोभून दिसलं नसतं. शिवाय त्याचं मोईवर प्रेम होतं. अशी अतिरेकी कृती करून त्याला मोईचा अपमान नव्हता, तिच्या तिरस्कारला पात्र व्हायचं नव्हतं. पाणी भरून होताच मोई आणि तिच्या मैत्रीणी जाण्यासाठी वळल्या तसा हुन आडोशामागून बाहेर आला आणि आपण खूप थकलेले व तहानलेले प्रवासी आहोत असं भासवत मोईच्या जवळ गेला.
"प्.... पाऽणी.... पाणी...." हुन खाली कोसळला.
मोई आणि तिच्या मैत्रीणी धावतच हुन पाशी गेल्या. मोई ने झटकन आपल्या सॉन्गमधून थोडंसं पाणी हातावर घेऊन ते हुनच्या चेहे-यावर शिंपडलं. हुनने अर्धवट मिटलेल्या डोळ्यांनी ते पाहिलं. मोईच्या हातचा पाण्याचा शिडकावा त्याला अमृताच्या शिडकाव्यासारखाच वाटला. डोळे किलकिले करत शुद्धीवर आल्यासारखं भासवत हुनने इकडे तिकडे पाहिलं.