पान १३


“मग ’तो’ मान कुणाला मिळणार?”

“कुणाला म्हणजे? लिफेनला! तीच तर या शयनकक्षाची प्रमुख दासी आहे. हा कक्ष निटनेटका ठेवण्याची जबाबदारी तिचीच आहे ना!”

“हंऽऽऽ! लिफेन मग काय करणार त्या कपड्याचं?”

“अजून काही ठरवलं नाही, बाई! आधी मिळू तर देत.”

मिंगला कळेचना की हे बोलणं कशाबद्दल आहे. शेवटी तिने लिफेनलाच विचारलं, तशी लिफेन खुदूखुदू हसू लागली. मिंग आणखीनच गोंधळली. मग लिफेनने तिला सांगितलं.

“अगं वेडे, आज हुन सरकार आणि मोई बाईसाहेबांच्या विवाहाची पहिली रात्र! आज ते ह्या शयनकक्षात एकत्र झोपणार. त्यावेळेस, त्यांच्या येण्याआधी ह्या पलंगावर एक सॅटीनचा पांढरा कपड़ा चादरीसारखा अंथरायचा. जर मोई बाईसाहेबांचा कौमार्यभंग झाला नसेल, तर आज त्यांना मिळालेल्या एकांतानंतर या पांढ-या चादरीवर रक्ताचा पुसटसा का होईना पण

लग्न म्हणजे सुख, आनंद, समाधान असं बरंच काही ऐकलं होतं मोईने पण पहिल्याच रात्री असं विचित्र संकट तिच्यासमोर उभं राहील, याची तिने कल्पनाही केली नव्हती. बरं! यातून सुटका होण्याचाही काही मार्ग दिसत नव्हता. त्या छोट्याशा बातमीने तिला चांगलंच अस्वस्थ केलं.

भेटवस्तू स्विकारण्याची वेळ संपली. जेवणं आटोपली. पण मोईचं कशातच लक्ष लागलं नाही. शेवटी नवरा-नवरीने आपल्या खास सजवलेल्या शयनकक्षात जाण्याची वेळ समीप आली. मोई आणि हुनच्या मागून ब-याच दासी गाणी म्हणत चालल्या होत्या. मिंग मोईच्या जवळच उभी होती. हुन तर आनंदाने ती गाणी ऐकत होता. मोई हुनकडे पाहून बळेच हसत होती. मिंगला मोईच्या मनातील गोष्ट माहित असल्याने तिला मात्र हसूही येत नव्हतं की ती गाणंही म्हणू शकत नव्हती.

शयनकक्षाच्या दाराशी येताच दासींची चेष्टामस्करी अधिकच वाढली आणि त्यांनी हुन व मोईला आत ढकलून दरवाजा बाहेरून बंद केला. हुन अजूनही बंद दरवाजाकडे पाहून हसत होता. मोईला मात्र दासीचं ते खिदळणं असह्य झालं होतं. हुनला आपल्या मनातील गोष्ट कशी सांगावी तेच तिला कळत नव्हतं.


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------