पान ९


“डोन्ट वरी यार. कुछ नही होगा.... हा फक्त एक प्रयोग आहे....मी रितू वहिनीला यातलं काहीच सांगितलेलं नाही....अरे बाबा, उद्या संध्याकाळी, ती गावात कुणाला तरी भेटायला जाणार आहे, ती वेळ आपल्यासाठी एकदम सोयीची आहे....ती येईपर्यंत आपलं काम झालेलं असेल....च्‍! आता नसते घोळ घालू नकोस.... तू ये इथे.... पप्पांशी काय बोलायचं ते मला माहित आहे.... काय वेडा झाला काय?.... अरे अशा गोष्टी कुणी आई-बापाला सांगतं का?.... माझ्या दादाला सुद्धा मी हे सांगितलेलं नाही तर....हं! दॅट्स लाईक अ गुड फ्रेंड.... चल देन.... बाऽय!”

साहिलने बोलणं संपवून मोबाईल बंद केला आणि दारात उभ्या असलेल्या रितूला पाहून चपापला.

“त्‍... तुम्ही.... अरे, वहिनी, तुम्ही केव्हा आलात?”

“आई-वडिलांपासून काही गोष्टी लपविण्याचा सल्ला तू तुझ्या मित्राला देत होतास ना, तेव्हा.”

साहिलचा जीव भांड्यात पडला. “नशीब! हिने सुरूवातीपासून काही ऐकलेलं नाही तर.”रितूने क्षणभर विचार केला.

“स्टोअर रूम द्यायला हरकत नाही पण मला खरं सांग साहिल, तुझा मित्र ’मित्रच’ आहे ना?”

“बास का वहिनी? तुमच्याशी इतकं खोटं बोलेन का मी?”

रितूने त्याच्या नजरेला नजर भिडवत म्हटलं, “तू खोटं बोललास तरी मला ते कळेलच साहिल. कारण तुझ्या मित्राची भेट घेतल्याशिवाय मी घरातून बाहेरच पडणार नाही.”

साहिलने वरकरणी हसून रितूचं कडवट बोलणं ऐकून घेतलं.

“ठिक आहे, वहिनी. माझ्या मित्राला भेटून मगच बाहेर पडा तुम्ही.”


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------