पान ३३


जयरामकाका, अरविंदकाका आणि राजेश तिघांनी आपली बोटं इंडिकेटरवर टेकवली.

“आता डोळे बंद करा आणि चित्त एकाग्र करा. तुमचं लक्ष केवळ इंडिकेटरवर असलेल्या बोटांकडे असलं पाहिजे.” जयरामकाकांनी सूचना केली.

दोघांनीह डोळे बंद केले. जयरामकाकांनी हलक्या हाताने तो इंडिकेटर बोर्डवरच तिनदा वर्तुळाकार फिरवला आणि त्यांनी डोळे बंद केले. ते काहीतरी पुटपुटत होते. हळूहळू त्यांचा आवाज वाढला. जणू काही ते कुणाला तरी आज्ञा करत आहेत अशा प्रकारचा आवाज होता तो. अचानक ते थांबले आणि त्यांनी गंभीर स्वरात प्रशन केला.

“सुभानराव, तू आला आहेस?”

राजेश आणि अरविंदकाकांना बोर्डवरचा इंडिकेटर हळूहळू सरकल्याची जाणीव झाली. जयरामकाकांनी राजेश आणि अरविंदकाकांना डोळे उघडायला सांगितलं. त्यांनी पाहिलं, इंडिकेटर YES वर जाऊन थांबला होता. जयरामकाकांच्या ओठांवर एक अस्पष्टसं स्मित आलं. ते पुन्हा गंभीर स्वरात फर्मावलं.

“तू सुभानराव आहेस, याचा पुरावा दे.”

इंडीकेटर हलला. एकेका अक्षरावरून फिरत एक वाक्य तयार झालं – “काय पुरावा हवा आहे?”

“तुझं पुर्ण नाव सांग.”

इंडिकेटर पुन्हा हलला – सु भा न रा व स र्जे रा व पा टी ल

जयरामकाकांनी एक नि:श्वास सोडला. अरविंदकाका आणि राजेश जयरामकाकांकडे पहात होते.

आता जयरामकाकांनी आपल्या खर्‍या प्रश्नांना सुरुवात केली.

“तू हेलनचा अपराधी आहेस. तू तिचा खून केलास?”“हेलन आलीस?”

-हो.

“तुझं काम झालं?”

-हो.

“तुला इथून जावं लागेल आता.”

-मी तयार आहे.

“तुला आता मुक्ती मिळेल.”

-मला माहित आहे.

“हेलन, सुभानरावाचा सूड घेतल्याक्षणी तू सर्व बंधनांतून मुक्त झाली होतीस. मग थांबलीस का?

-आभार मानायला.

“आम्हाला सहकार्य केल्याबद्दल मीही तुझे आभार मानतो. आता तू जाऊ शकतेस हेलन.”


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------