पान ३०


जयरामकाकांनी संतापाने मान दुसरीकडे वळवली. हेलन खाली मान घालून रडत होती. राजेश तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता. त्याने पुढची कथा जयरामकाकांना सांगायला सुरूवात केली.

मुलाबाळांना खरं सांगण्याची हिम्मत त्याच्यात नव्हती, म्हणून मनाला येईल ते कारण सांगून त्याने आपल्या कुटुंबाला त्या घरापासून दूरच ठेवलं. हेलनने सुभानरावाला एकदा पाहिलं होतं. आपल्याला आयुष्यातून उठवणार्‍या सैतानाचा बळी घेण्याच्या इच्छेने तिचा आत्मा तिथेच घुटमळत राहिला. तिला काळाची शुद्ध नव्हती, वेळेची पर्वा नव्हती. सुभानराव आला की त्याला सोडायचं नाही या एका आशेवर ती रोज रात्री तेच तेच मरण जगत राहिली.”

हेलनने मान वर करून राजेशकडे पाहिलं. राजेशच्याही डोळ्यांतून अश्रू वहात होते.


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------