पान २७


ती राजेशच्या चेहे-यावर ओळखीच्या खुणा शोधत होती. मधेच तिची मान नकारार्थी हलली आणि तिने राजेशला विचारलं, “यू आर नॉट वन ऑफ देम. आर यू?” तिने विचारलं.

तिच्या प्रश्नाचा रोख राजेशला माहित होता. त्याने उत्तर दिलं.

“नाही, हेलन. मी त्यांच्यापैकी नाही. इथे कुणीच त्यांच्यापैकी नाही. तू सुरक्षित आहेस.”

तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.

“मग मला प्लीज माझ्या घरी जाऊ दे. तू मला माझ्या घरी नेशील का?”हेलनची मात्र रॉबर्टबद्दल काहीच तक्रार नव्हती. त्याच्यासोबत रहायला मिळतंय, हाच तिच्या दृष्टीने सर्वोच्च आनंद होता. त्यातच तिच्या आनंदात भर घालणारी एक घटना घडली. वरिष्ठ अधिकारी जेम्स टॉमस यांनी सर्व पोलिस अधिकार्‍यांच्या पत्नींच्या सन्मानार्थ एक मेजवानी आयोजित केली होती. रॉबर्ट आणि हेलनलाही या समारंभाचं निमंत्रण होतं. ती या समारंभाला जाण्यास खूप उस्तुक होती. कदाचित तिला काही अधिकार्‍यांच्या पत्नींशी ओळख करून घेता आली असती. या देशात तिला तिच्या देशातील मैत्रीणींची नितांत आवश्यकता होती.

समारंभाला जाण्यासाठी हेलनने पारंपारिक पोशाखाची निवड केली. पायघोळ झगा, फुगीर बाह्यांना सॅटीनची झालर, गळ्याजवळही सुंदर नक्षी असलेली फीत, गळ्यातील मोत्यांची माळ सारं कसं हेलनच्या गौरकांतीला शोभून दिसत होतं. ती तयार होऊन बाहेर आली आणि रॉबर्ट तिच्याकडे पहातच राहिला.

“आज कितीजण तुझ्या रूपावर फिदा होणार आहेत कुणास ठाऊक? समारंभातील एकही लेडी तुझ्याशी मैत्री करणार नाही.” रॉबर्ट चेष्टेने म्हणाला.

“डोन्ट वरी. माझ्यावर कितीही फिदा झाले, तरी मी मात्र फक्त तुझ्यावरच फिदा आहेस, हे विसरू नकोस.” हेलन त्याच्याजवळ जात म्हणाली.

रॉबर्टने प्रेमाने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि ते दोघे समारंभाला जाण्यासाठी बाहेर पडले.


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------