पान २०


अरविंदकाकांनी मागचा पुढचा काही विचार न करता, साहिलच्या एक कानाखाली मारली.

“नालायक! असले उद्योग करताना काय होऊ शकतं याचा विचार केला होतास का?” अरविंदकाका चढ्या आवाजात बोलले.

“काका.... काका.... प्लीज! त्याच्यावर हात उचलू नका. अहो, त्याला काय कल्पना.... “

“मुळात अशा माहित नसलेल्या गोष्टी कराव्यातच का मी म्हणतो?” अरविंदकाका साहिलकडे रागाने पहात बोलले. “ह्या कार्ट्याला काही अक्कल आहे की नाही? असल्या गोष्टीत विषाची परिक्षा पहातात का?”“कुठे रहातात माहित आहे तुला?”

“माहितीय....”

आता अरविंदकाकांनी राजेशला अडवलं. ते रागाने साहिलकडे पहात राजेशला समजावू लागले.

“राजेश, महादूचं घर मला माहित आहे. तुला रितूची काळजी आहे तशीच मलाही आहे. पण हे खेडेगाव आहे. पायाखालचा रस्ता सवयीचा नाही. रात्रीच्या वेळी जनावर कुठे दबा धरून बसतं, काही सांगता येत का? आता रात्रीतून तर तुला मुंबईला काही परत जाता येत नाही, तर सकाळीच महादूच्या घरी जा ना! तुला व्यवस्थित बोलताही येईल.”

राजेशला अरविंदकाकांचा सल्ला पटला. अंथरूणावर अंग टेकताच त्याला गाढ झोप लागली. मधेच केव्हातरी त्याचा मोबाईल वाजला. त्याने फोन उचलून हॅलो म्हणायच्या आधीच तो कट झाला.

“शॅ:ऽ! हे नेटवर्क ना!” असं म्हणून राजेश पुन्हा झोपी गेला. झोपेत केव्हातरी त्याला रितूचा चेहेरा दिसला. रितू खूप लांबून हाका मारून त्याला बोलवत होती.


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------