पान १४


रितूला पुढे येताना पाहून त्या स्त्रीने मनुच्या गळ्याला धरून त्याला एका हातावर अधांतरी लोंबकळतं उभं केलं. रितूने पुढे उचललेलं पाऊल मागे घेतलं आणि ती ढसाढसा रडू लागली. मनूचे डोळे अजूनही मिटलेलेच होते. त्याला काही कळत होतं की नाही कुणास ठाऊक पण रितूला त्याची ती अवस्था पहावत नव्हती. उभं रहाण्याचे त्राण तिच्या पायात उरले नाहीत. ती खाली कोसळली."मनू काय करतोय?"

"झोपलाय."

"झोपू देत त्याला. तू तिथून निघालीस की मला फोन कर म्हणजे मला अंदाज राहील तुझ्या पोहोचण्याचा. मी स्टेशनवर येतो, तुला पिक-अप करायला.”

“ओ.के." रितूने हसत उत्तर दिलं.

"आणखी काय? झालं का तुमचं शोधकार्य पूर्ण?"

ते वाक्य ऐकताक्षणी रितूच्या चेहे‍र्‍यावरचं हसू मावळलं. तिचा चेहेरा एकदम दगडी झाला.

"चल, फोन ठेवते मी.... घरी आले की बोलू..."

"रितू? हॅ..... हॅलो रितू....?"

राजेश विचारात पडला होता. “आपण असा काय प्रश्न विचारला की रितूने तडकाफडकी फोन बंद केला…. नाही.... राग नसेल, कदाचित मनू उठला असेल.... मनूची खूप काळजी असते तिला.....”


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------