पान १३


हॉलमधे पाऊल ठेवल्याक्षणी रितूला रडण्याचा आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागला.

"अच्छा, म्हणजे ह्या बाजूने आवाज येतोय तर!"रितू कमालीची घाबरली होती. पण मनूला त्या स्त्रीच्या ताब्यात पाहून तिच्यातल्या आईने भितीवर मात केली. मनूला त्या स्त्रीच्या हातून परत मिळवण्याच्या दृष्टिने रितूने दरवाजातून आत पाऊल टाकलं. त्यासरशी ती स्त्री ताडकन उठली. मनूला आपल्या दोन्ही हातांवर तोलून अत्यंत अभद्र सूरात हेल काढून तिने स्वत:भोवती मान फिरवली. रितू नखशिखांत थरथरत होती. पण तरीही तिने पुढे पाऊल उचललं.


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------