पान ११


“छे! तासाभरात येईन म्हणाले होते. आता दोन तासांच्या वर उलटून गेले. ही पोरं काय करत असतील कुणास ठाऊक?”

रितूने आपल्या चालण्याचा वेग वाढवला पण वाट जणू संपतच नव्हती. शहरात राहिलेल्या रितूला गावातील दगड्धोंड्यांवरून चालण्याची सवय नव्हती. मधेच ठेचकाळायला होत होतं. त्यात करकरीत तिन्हीसांजेचा अंधार आणि महादूच्या आजोबांनी घराबद्दल सांगितलेल्या गोष्टींनी तिच्या मनावर भितीचा पगडा बसला होता. मनूला दुस-यावर सोपवून आजवर ती कधीच कुठे गेली नव्हती. ’आजच आपल्याला ही बुद्धी कशी काय झाली’, म्हणून ती मनातल्या मनात स्वत:लाच बोल लावत होती.आतून मनूची रडकी हाक ऐकूनसुद्धा रितूला हायसं वाटलं. तिने धक्का देऊन दरवाजा उघडला. आतलं दृश्य पाहून रितू जागच्या जागी खिळली.

आत एका रॉकिंगचेअरला झोके देत मनू एकटाच पाठमोरा उभा होता. कुठलंसं गाणं म्हणत होता. रितूने दारातूनच त्याला हाक मारली.

"मनू?"

मनूने शांतपणे मागे वळून पाहिलं आणि रितूचे डोळे विस्फारले. मनूचा चेहेरा खूप प्रौढ आणि पांढरा फटक दिसत होता. रितूकडे पाहून मनू भयाण हसला.

"मम्मी..."

हा आवाज मनूचा नव्हताच. रितू अविश्वासाने मनूकडे पहात होती. हळूहळू मनूच्या चेहे-यात बदल होऊ लागला. चेहेरा जाऊन त्याजागी आता कवटी दिसू लागली.

रितूच्या तोंडून भयातिरेकाने किंकाळी बाहेर पडली.


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------