पान १०


“हे काय?” अमितच्या हातातील मोठ्या पार्सलकडे पहात रितूने विचारलं.

“पाट आहे पाट. बसण्यासाठी!

“....आणि या मेणबत्त्या कशाला? वातावरण निर्मितीसाठी?” रितूने हसत हसत विचारलं.

“हो, हो.” तिच्याकडे चुटपुटत्या नजरेने पहात अमित म्हणाला.

“बराय. चालू द्यात तुमचे उद्योग. पण जरा आटोपतं घ्या. मला तासभर तरी लागेल जाऊन यायला तोपर्यंत आटोपेल ना तुमचं?”

“अगदी नक्की?”

“किचनमधे तुमच्यासाठी खायला करून ठेवलंय, भूक लागली तर खा.”

“ओ.के. थॅंक यू, वहिनी.”

“मनू चल, आपण जाऊन येऊ.” रितूने मनूचा हात धरला.

“मी नाय येत.”


मनू रितूला टाटा करत असताना अमित साहिलच्या कानात कुजबुजत होता.

“अरे अशा कामात लहान मुलांची एकाग्रता खूप कामी येते म्हणे. बघू, ह्या छुटकुचा काही उपयोग होतो का. नाहीतर त्याला त्याच्या आईच्या रूममधे थोडावेळ बंद करून ठेवू. सांगू, आम्ही लपाछपी खेळत होतो. काय?”

साहिलने हसत हसत अमितच्या हातावर टाळी दिली.


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------