पान ९


तरीदेखील सदाला मांत्रिकाच्या मारापासून वाचवण्यासाठी सदाची बायको धीर एकवटून आपल्या सासूला म्हणाली, "आत्या, याच्यापरिस त्यांला डागदरकडं निऊया की."

सदाच्या आईने हे ऐकलं मात्र! मांत्रिकापेक्षाही तिचा चेहेरा रागीट दिसू लागला. ती सदाच्या बायकोच्या अंगावर खेकसली, "गप बस! ज्यात कळत न्हाई त्यात बोलू नगंस, कमळे. माझा एकुलता एक प्वोरगा हाय त्यो."

आपण पुढे तोंड चालवलं तर काय होणार हे कमळीला माहीत होतं, ती काही न बोलता पुढचा तमाशा उघड्या डोळ्यांनी पहायला तयार झाली."का गं, कमळे? भरल्या घरात हा काय अवतार करून बसलीयास?" त्याने मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचारलं. इतक्या दिवसांनी भाऊ दिसला, तोही अशा दिवशी. कमळीला आपलं दु:ख आवरता आलं नाही. ती हमसाहमशी रडू लागली.

"अगं काय बोलशील तरी? निसतीच डोळं गाळाया लागलीस तर तुज्या मनातलं समजाया म्या काय मांत्रिक हाय व्हय?"

कमळीची मान संतापाने ताडकन वर झाली.

"तू कशाला मांत्रिक व्हतोयंस? आत चल, सगळा तमाशा दिसंल तुला." असं म्हणून कमळीने रामचंद्राला आत येण्यासाठी इशारा केला.


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------