पान ७


“गावात ज्ये चाललंय, त्येला भुताटकी म्हनत्यात, हे तुला पटतं का?” तुकाजीने विलासला प्रश्न केला.
“मला नाय वाटत ही भुताटकी हाय. गावातलाच आसन कुनीतरी.” विलासने म्हटलं.
“गावातला? छ्या! नाय नाय...” दादू म्हणाला.
“त्येच म्हन्तो मीबी! गावातल्या मानसापाशी आशी जिगर नाय. ह्ये काम गावाभायीरच्याच कुनाचंतरी हाय.” राघू टेबलावर जोरात हात आपटत म्हणाला."तुला सांगतो पतंग्या, ही भुताटकीच हाय." किशा कॅनमधे दारू ओतता ओतता कुजबुजत म्हणाला.
पतंग्याने चमकून किशाकडे पाहिलं. भितीने त्याचे हात थंड पडले होते.
"खरं सांगतोस रं किश्या?" पतंग्यानेही कुजबुजतच विचारलं.
"मंग काय! आरं, या तुकाजीरावाच्या चांडाळ चौकडीचा इस्वास बसत न्हाय पण आत्ता सदाला पायलंस ना! कसा चळाचळा कापत व्हाता तो. आपलीबी हीच गत व्हायची गड्या." किशा धास्तावलेल्या स्वरात म्हणाला.
"गप रं! उगा घाबरवू नगंस. काय नाय होत. चल, कामाला लाग. नायतर नायतर तो तुक्या येईल वरडत पुन्ना." पतंग्याने मनातील भिती घालवण्यासाठी किशाला दम भरला आणि तो जायला वळला. एक क्षण थांबून त्याने पुन्हा किशाला हाक मारली.
"अं... किशा, रातच्याला घरी जाताना माह्यासाठी थांब बरं का! संगतीच जावू."
किशा समजल्यासारखं हसला आणि निघून गेला.


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------