पान ६


शिरपती सकाळी गुत्त्यावर जाण्यासाठी म्हणून जो बाहेर पडला, तो अजून घरी आला नव्हता. त्याची बायको लक्षुमी त्याला शोधायला बाहेर पडली. शिरपती एका ठिकाणी दोन घरांच्या मधल्या भागात पडून होता. अंगावर ओरबाडल्याच्या खुणा, जागोजागी खरचटलेलं.... असं वाटत होतं की त्याची कुणाशी तरी मारामारी झाली असावी. लक्षुमीने त्याला आधार देऊन उठवलं. शिरपती अजूनही नीट शुद्धीवर आला नव्हताच. शेवटी लक्षुमीने गावातल्याच दोन पोरांच्या जोडीने शिरपतीला घरी नेलं आणि घरगुती उपचार केले. शिरपती शुद्धीवर आल्यावर आपली कुणाशी मारामारी झाली हे त्याला आठवतंच नव्हतं.दारूचा गुत्ता जरी धनाजीच्या नावावर असला तरी भट्टी चालवत होता तुकाजीच. त्याला साथसंगत करणारे लोक तिथे येऊन जाऊन असत. गावात भुताटकीमुळे निर्माण झालेली दहशत आपल्या धंद्यावर तर परिणाम करणार नाही ना, अशी भिती तुकाजीने त्यांच्याकडे बोलून दाखवली. कारण स्वस्तात दारू मिळते म्हणून आजूबाजूच्या गावातील माणसंही या गावात येऊ लागली होती. धंद्याला बरकत येत असतानाच या भुताटकीमुळे गावाबाहेरून आलेल्या लोकांना त्रास होऊ लागला होता. एक जण धड जाऊ शकत नव्हता.


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------