पान ५


धोंडीबाचा विचार मनात येतात तिच्या मनाचा बांध फुटला. कसाही असला तरी नवरा होता तिचा तो. दारूची अवदसा घरात नसती आणली तर खाऊन-पिऊन तृप्त होतं त्यांचं कुटुंब. रखमाचे पाय जड झाले. वेशीवर असलेल्या मारूतीच्या देवळाबाहेरच ती मटकन बसली. तिने बिट्ट्याला पोटाशी धरलं. बिट्ट्याही तिच्या जोडीने रडत होता.“मारूतिराया, आय म्हन्ती का गावात सटवाई आली हाय. ती गावात आन् तू गावाभायीर. मंग कशी जानार ती? माजा बा रोज दारू पितो, रोज आयेला मारतो, मला बी मारतो, कामाला जात न्हाई....माज्या बाला पुन्ना पयल्यासारखा करशील का रं?”

रखमाने आपले पुन्हा पाणावलेले डोळे पुसले आणि मारूतीला बाहेरून नमस्कार केला. मागून कुणीतरी पदर ओढत असल्याचं तिला जाणवलं म्हणून तिने वळून पाहिलं तर मघाची ती माकडीण एका हातात पेरू घेऊन उभी होती आणि दुसर्याळ हाताने ती रखमाचा पदर ओढत होती. तिने हात पुढे करून रखमाला तो पेरू दिला. माकडीण आली तशी निघून गेली. तिच्या पाठोपाठ बाकीची माकडंही झाडावर निघून गेली. रखमाने बिट्ट्याला सोबत घेऊन पुन्हा आपल्या घरचा रस्ता धरला.


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------