पान ४


रखमाने पुढे काही बोलायला तोंड उघडलं, तेवढ्यात धोंडीबा आपला तोल सावरत उठला. इतका वेळ तो एका कोपर्याडत अंथरलेल्या कांबळ्यावर दारूच्या अंमलाखाली निपचीत पडून होता पण बहुधा त्याने सगळं ऐकलं असावं.

“तिच्याXXX त्या मास्तरड्याच्या!” तो दोन्ही हात झटकत बिट्ट्याच्या जवळ गेला आणि त्याचा दंड ओढत म्हणाला, “चल... चल, बगू मला तुजा मास्तर काय म्हन्तो त्ये. चल...”“बास झालं! आता मी आन्‌ माजा पोरगा घरात न्हाई थांबनार.” तिने धोंडीबाचा हात हिसडा देऊन सोडला आणि बिट्ट्यासोबत तिने गावाबाहेरचा रास्ता धरला. इकडे धोंडीबा निरर्थक बडबड करत अंगणातच झोपला.

गावाची वेस जसजशी जवळ येत गेली तसतसा रखमाच्या रागाचा पारा खाली येत गेला. मोठ्या निर्धाराने घराबाहेर पड्ली होती ती. पण आता तिच्या मनात विचार येत होते. “जाऊन जानार कुटं? भावाकडं? त्यो किती दिवस सांबाळंल? नंतर?... बिट्ट्याचं काय? आनि... धनी...?”


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------