पान २


अशा या गावात एक दिवस एक पाहुणा आला. पाहुणा म्हटल्यावर माकडांनी सर्वात आधी त्याच्याकडून पाहूणचार घेतला, नी मगच त्याला पुढे जाऊ दिलं. हा पाहुणा होता तुकाजी पाटील. धनाजीराव पाटीलांचा सख्खा लहान भाऊ. एकदम वांड. लहानपणी तर माजलेल्या वळूसारखा नुसताच गावभर फिरायचा. आधीच वाईट संगत, त्यात आईबापाने केले नसते लाड. तो विशीचा असेल, तेव्हा त्याने तालुक्याच्या बाजारात कुणाशी तरी मारामारी केली होती म्हणे. मारामारीचं पर्यवसान खुनात झालं होतं पण धनाजीराव पाटलांच्या हस्तक्षेपामुळे शिक्षेचा कालावधी कमी झाला. १५ वर्षांची शिक्षा पाच वर्षावर आली."हां! हे करता येईल. न्हाईतरी गावात येकच दारूचा गुत्ता हाय, त्योबी आपलाच! आन् तिथं बाहेरून आनल्याली दारूबी जरा म्हाग इकावी लागती. दारूची भट्टी एकदा का गावात लागली का स्वस्त आनि मस्त दारूसाठी लाईन लागंन.” तुकाजीने आपला विचार मांडला.

झालं! तुकाजीच्या मनात आलं ते धनाजीरावाने मान्य केलं आणि त्याला दारूची भट्टी चालवण्यासाठी परवानगी मिळाली. ही परवानगी अर्थातच कायदेशीर नव्हती. पण कायदा त्या गावात कळत होता कुणाला? सरपंच म्हणेल तो कायदा! हा, हा म्हणता दारूची भट्टी लागली. स्वस्त आणि मस्त दारू गुत्त्यामधे सर्वांसाठी पाण्यासारखी वाहू लागली.


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------