पान १६


"वेगळ्याच कामात!" इन्स्पे. जमदाडे उपहासाने हसले. "दारूच्या भट्टीची नासधूस कुणी केली, त्याला शोधून काढायचं आणि मरेस्तोवर मारायचं. हेच ना ते वेगळं काम? त्यापेक्षा आपल्या भट्टीमुळे जी आग लागली त्यात कुणाचं काही नुकसान तर झालं नाही ना, हे आधी पहावं असं नाही वाटलं तुम्हाला. ती जबाबदारी तुमच्या मोठ्या भावाची?!... आणि कशासाठी करावं त्यांनी हे? कारण तुमच्यासारखा गुंड त्यांचा लहान भाऊ आहे म्हणून?""अटक? मला?" धनाजी गुरकावला.

"तुम्हाला अटक करावीच लागणार धनाजीराव. अहो तुमच्याच नावावर तर भट्टी चालवतात तुमचे धाकडे बंधुराज." धनाजीने संताप आणि असहायतेने डोळे मिटले. तुकाजीने तेवढ्यात निसटून जाण्याचा प्रयत्न केला पण तो नेमका मागे उभ्या असलेल्या हवालदारालाच जाऊन धडकला. तुकाजीची माणसं वेळ पाहून मागच्या मागे पसार झाली होती.

तुकाजीने संतापून रामचंद्राच्या नावाने एक अर्वाच्य शिवी हासडली.

"आता रामचंद्राला शिव्या देतोस? अरे, तू आणि तुझ्या माणसांनी विनाकारण मारलंत त्याला. सरकारी हॉस्पिटल मधे त्याला अ‍ॅडमिड करावं लागलं. तरीदेखील तुझ्या भट्टीवर जखमी झालेल्या लोकांना त्याचे मित्र मदत करत होते आणि तू त्यालाच शिव्या देतोयंस? त्याला मारहाण केल्याच्या आरोपावरून तुला अटक करायलाच मी इकडे आलो आहे."


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------