पान १५


पिसाळलेला तुकाजी तसाच आपली माणसं सोबत घेऊन रामचंद्राच्या घरी पोहोचला तेव्हा रामचंद्र घरात नव्हताच. रामचंद्राची आई तुकाजीला पाहूनच गांगरून गेली होती. तिला धड काहीच सांगता आलं नाही. तुकाजीने त्याची माणसं तालुक्याच्या गावीही पाठवली पण रामचंद्र काही सापडला नाही.तुकाजी पुन्हा काही्तरी बोलणार होता पण इन्स्पे. जमदाडेंनी त्याला हातानेच अडवलं. "तुकाजीराव, तुमच्या भट्टीवर जी माणसं जखमी झालीत, त्यांना तालुक्याच्या सरकारी हॉस्पिटलात ठेवलंय. त्यांच्यावर उपचार करण्याआधी अपघाताचं कारण काय देणार होतात तुम्ही? बोला? त्यांचा इलाज होतोय तो धनाजीरावांच्या शब्दावर. तुमच्या जखमी माणसांना तोंडदेखलं भेटायला तरी गेलात का तुम्ही?"

" म्या... त्यो... रा… अं.. म्या एका येगळ्याच कामात अडकलो होतो." तुकाजीने गुळमुळीतपणे उत्तर दिलं.


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------