पान १४


त्याच रात्री धनाजी-तुकाजीच्या हातभट्टीवर हल्ला झाला.... भुताटकीचा! भट्टीबाहेर तयार असलेले दारूचे भरलेले पिंप भुताटकीने फोडले. सगळी दारू मातीत मिसळली. भट्टीची पत्र्याची शेड कोसळली. भट्टीच्या एका बाजूला आगही लागली. सुदैवाने ते वेळीच लक्षात आलं म्हणून नाहीतर आग गावात पसरायला वेळ लागला नसता. भट्टीवर काम काम करणारे दोन-तीन कामगारही थोडेफार जखमी झाले होते. त्यांना ताबडतोब तालुक्याच्या गावच्या इस्पितळात हलवावं लागलं.तुकाजीच्या माणसाचा अवतार पाहून सदाला खरंतर या प्रश्नाचं उत्तर देण्याची अजिबात इच्छा होत नव्हती पण तो न बोलता तर त्याची धडगत नव्हती, हे त्याला चांगलं माहित होतं. त्याने रामचंद्राचा पत्ता देऊन टाकला. तुकाजीची माणसं निघून गेली तशी कमळी सदाशी तावातावाने भांडायला लागली. तिचंही बरोबर होतं म्हणा. रामचंद्र तिचा सख्खा मोठा भाऊ होता. तुकाजीची माणसं कशी आहेत, हे तिला चांगलं माहित होतं.


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------