पान १२


"आरं ये. काय नाय झालंय तुज्या बा ला. एकदम मस्त हाय त्यो. ये चल." रामचंद्राने पुन्हा बोलावल्यावर मात्र विकास पुढे झाला. रामचंद्राकडून बिस्किटांचा पुडा, खेळणं घेतल्यावर त्याची भिती थोडीशी कमी झाली. सदाच्या अंगावरचे वळ बघून त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने हळूच सदाला हात लावला. सदाने चटका बसल्यासारखा हात बाजूला केला.

"बा, लई दुकतं का रं?" त्याने सदाला विचारलं.
"हां, थोडं दुकतंय. आधीच भुताटकी वार, त्यात मांत्रिक बाबाचा मार..." सदाने वैतागून एक सुस्कारा सोडला."बाबौ! हंगामाच की!" विकासने तोंडावर हात ठेवत म्हटलं. तो नुसत्या कल्पनेनेच चकीत झाला होता. त्याला हसू आवरत नव्हतं.

विकासकडे पहाता पहाता रामचंद्राच्याही चेहेर्‍यावरचे भाव बदलले. त्याने नकळत दोन्ही हात डोक्यावर ठेवले आणि तो उद्गारला, “"आरं बाबा माज्याऽ!"

डोक्यावर हात तसेच ठेवून त्याने एकदा सदाकडे पाहिलं, एकदा विकासकडे पाहिलं. मग झटका आल्यासारखा वळून त्याने सदाच्या आईचे हात धरले. "आलोच म्या," असं म्हणत रामचंद्र तसाच उठला आणि घराबाहेर पडला. सदाने दरवाजाच्या चौकटीकडे पाहिलं आणि तो आपल्या आईला म्हणाला, "साथीच्या रोगावानी भुताटकीबी येकाची दुसर्‍याला लागती का काय?"

Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------