पान ११


आपण सदाच्या आईशी मगाशी जास्तच उद्धटपणे बोललो असं रामचंद्राला वाटलं. त्याने पुढे होऊन सदाच्या आईच्या पायावर डोकं ठेवलं.

"आरं, आरं! काय करतुयास?"
"मला माफ करा आत्या. म्या तुमच्याशी लई रागावून बोललो मघा. पन सदानंदरावांचं हाल मला बगवनात."


सदा काहीच बोलण्यच्या मन:स्थितीत नव्हता. त्याचं लक्ष कमळीच्या येण्याकडे होतं. तिला स्वयंपाकघरातून आलेली पाहून त्याला बरं वाटलं. इतकं थकल्यावर काहीतरी अन्न पोटात जाणं ही त्याची गरज होती. कमळीने आणलेला चहा आणि बटर पाहून त्याचे डोळे लकाकले.
रामचंद्रानेही ते पाहीलं. त्याने काही न बोलता सदाच्या पुढ्यात चहा आणि पाच-सहा बटर ठेवले. इतका वेळ काही न बोलता सर्वकाही पाहाणार्‍या सदाच्या मुलावर त्याची नजर गेली. सदाचा मुलगा विकास एका कोपर्‍यात गपचूप बसून मोठ्या माणसांचं काय चालंलं आहे, हे पहात होता.

"ए, इकास. काय त्या कोन्यात बसून करतो रे? ये, इकडं ये. तुज्यासाटी काय आनलंय बग." रामचंद्राने विकासला हसून बोलावलं. विकास मात्र सदाकडे पहात पुढे जावं की न जावं या विचारात तिथेच बसून होता.

Share this post:

0 comments

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------