पान १


तसं उदगाव हे शहरापासून तुटलेलं. शहरीपणाचा स्पर्श जवळजवळ न झालेलंच. गावात वीज आली असली तरी प्रत्येकाला ते परवडत नव्हतं म्हणून बर्‍याच घरांमधे अजूनही रॉकेलच्या चिमण्या टिवटिवताना दिसायच्या. पण गावात वैशिष्ट्य खूप. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे गावाचं नाव - उदगाव. या गावची माती उदीसारखी राखाडी रंगाची; अशी माती इतर कुठल्याच गावात दिसायची नाही म्हणून या गावाला उदगाव हे नाव पडलं. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे गावाच्या वेशीभोवती लावलेली फळझाडं. ती कुणाची होती, माहित नाही. गावात प्रत्येकाकडेच कसण्यापुरती थोडीफार जमीन होती पण त्या कुणीच... की त्यांच्या बाप-आजोबांनीही ही फळझाडं लावल्याचं त्यांना स्मरत नव्हतं.गावकरीही माकडांना काही ना काही खायला देत असत, त्यांच्या दृष्टीने माकड म्हणजे मारूतीचं दुसरं रुप. वेशीवरच्या मारूतीच्या देवळातला माकडांचा मुक्त संचार गावकर्यां च्या समजूतीत भरच टाकायचा. उदगावात जशी चांगली माणसं होती, तशीच वाईट माणसं सुद्धा होती. काही पारावर बसून शिळोप्याच्या गप्पा मारायची तर काहींना गावतल्याच आयाबहीणींची छेड काढण्यात धन्यता वाटायची. काही शिक्षणासाठी १० मैल चालत जाऊन तालुक्याच्या शाळेत शिकायचे तर काही गावातल्याच घरातील ऐवजावर डल्ला मारायचे. काहींना आधुनिक तंत्रज्ञानाची ओढ होती तर काही ‘जुन्याच वाटांनी जाऊ’ असं म्हणत आधुनिकतेला मागे ढकलत होते.


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------