पान २४

“आणि प्रेताच्या पाठीत खुपसलेल्या चाकूवर.”

“ओह! आणि फूट प्रिन्ट्सचं काय?”

“सर, या बाबतीत इन्स्पे. राजेंनी सांगितलेली गोष्ट शब्दश: खरी आहे. त्या रानात पालापाचोळा, गवत आणि पाणी यांचं मातीबरोबर असं काही अजब रसायन तयार झालं होतं की तिथे फूटप्रिन्ट्स मिळणं मुश्किलच होतं. पायांचे भरपूर ठसे मला मिळालेत पण ते ठसे आरोपीचे आहेत, मयताचे आहेत की दुसर्याच कुणाचे आहेत हे मी खात्रीशीररित्या सांगू शकत नाही.”

“दॅट्स ऑल युवर ऑनर.” बॅ. खंदार्यांगची मुद्रा विजयी दिसत होती. समीरला क्रॉस करण्याची खूण करत ते आपल्या जागेवर जाऊन बसले.

“मि. गुर्जर, आरोपीच्या ठशांव्यतिरिक्त आणखी कुणाकुणाच्या हातांचे ठसे मिळाले तुम्हाला?” समीर.“तिच्या करंगळीचा आणि अनामिकेचा ठसा चाकूच्या पात्यावर होता.”

“एक मिनीट, एक मिनीट. मि. गुर्जर तुमची काहीतरी चूक होतेय. आर यू शुअर की तो ठसा आरोपीच्याच हातांचा होता?”

“येस सर, आय अॅीम शुअर.”

“तुम्हाला जर इतकी खात्री असेल, तर तुमच्या ज्ञानाला मी आव्हान देऊ शकत नाही, मि. गुर्जर. पण मला एक सांगा, तुम्ही जी ठशांची पोझिशन सांगताय त्यानुसार आरोपीने तो चाकू आपल्या उजव्या हातात धरला होता आणि पात्याचा धार असलेला थोडासा भाग तिच्या करंगळी आणि अनामिकेने झाकला गेला होता. बरोबर?”

“अगदी बरोबर.”

“मि. गुर्जर, ही झाली आरोपीच्या चाकूवर मिळालेल्या ठशांची गोष्ट. मला सांगा, मयताचे ठसे तुम्हाला चाकूवर मिळाले नाहीत?”

“मिळाले सर.”

“मग तसं तुम्ही आधी का सांगितलं नाहीत?”

“सरकारी वकिलांनी मला तसा प्रश्निच विचारला नाही. मी फक्त सरकारी वकिलांनी विचारलेल्या प्रश्नां ची उत्तरं दिलीत.”

“ओ.के. मग मला सांगा मयताचे जे ठसे तुम्हाला चाकूवर मिळाले त्यांची पोझीशन कशी होती?”

“मयताचे चाकूवरचे ठसे तीन-चार निरनिराळ्या पद्धतीतले होते.”

“म्हणजे तो चाकू आरोपीपेक्षा मयताने जास्त वेळा हाताळला होता तर!”

“येस, मि. सरदेसाई.”

“मयताच्या गळ्यात जे पातं खुपसलं गेलं होतं, त्यावर कुणाचे ठसे सापडले तुम्हाला?”

“कुणाचेच नाहीत. पात्याच्या टोकाला एक छोटीशी रिंग होती जिचा उपयोग मुठीसारखा करण्यात आला होता. अशा रिंगवर प्रिन्ट्स मिळणं शक्य नव्हतं.”

“कारच्या डिकीत कुणाचे ठसे मिळाले का तुम्हाला?”

“येस, सर. कारच्या डिकीत आणि डिकीच्या हॅन्डलवर आम्हाला ठसे मिळालेत पण ते ठसे मयत किंवा अरोपी यांच्याशी मॅच होत नाहीत.”

“या केसच्या संदर्भात ज्या ज्या व्यक्तींचे ठसे घेतले त्यापैकी कुणाशी हे ठसे मॅच करून पाहिलेत तुम्ही?”

“पाहिलेत. ठसे मॅच होत नाहीत.”

“थॅंक यू, मि. गुर्जर. तुम्ही जाऊ शकता.”

“दुपारच्या सत्रापर्यंत न्यायालयाचं कामकाज तहकूब करण्यात येत आहे.”

जज्ज सिन्हां हातोडा आपटून निघून गेले तरी बॅ. खंदारे कितीतरी वेळ तिथेच विचार करत बसून होते.


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------