Terms of Use - In English.

दि. ३१ मे २०१२ पासून लागू

मोगरा फुलला डॉट कॉमवरील साहित्य वाचल्याबद्दल आभार. या वेबसाईटवर प्रकाशित झालेले साहित्य हे कांचन कराई यांनी लिहीलेले आहे.

मोगरा फुलला उपरोक्त साहित्य आपल्याला खालील नियमांअंतर्गत उपयोग करण्यास व वाचावयास परवानगी देत आहे:

१. मोगरा फुलला डॉट कॉमच्या लेखिका व मालक - कांचन कराई यांच्याकडून लेखी पूर्वपरवानगी मिळाल्याखेरीज वेबसाईटवरील साहित्य आपल्याकडून कोणत्याही प्रकारे, कोणत्याही माध्यमाद्वारे वितरित केले जाणार नाही.

२. या वेबसाईटचा कोणत्याही भागामधे आपल्याकडून बदल अथवा फेरफार घडणार नाहीत.

३. मोगरा फुलला डॉट कॉमच्या लेखिका व मालक - कांचन कराई यांची लेखी पूर्वपरवानगी असल्याखेरीज आपण ही वेबसाईट कोणत्याही व्यावसायिक कारणांसाठी वापरणार नाही.

४. मालकी हक्क: या साईटवरील साहित्याचे (कथा) मालकी हक्क लेखिका कांचन कराई यांचेकडे आहेत. हे साहित्य कॉपीराईट व इतर बौद्धिक मालमत्ता कायदा व प्रतिबंधांद्वारे संरक्षित केलेले आहे. सर्व हक्क या वेबसाईटच्या लेखिका, चालक व मालक कांचन कराई यांचेकडे राखून ठेवलेले आहेत व आपल्याला निश्चितपणे दिलेले नाहीत. या वेबसाईटवरील साहित्य हे आपल्याला वाचनकरता व मनोरंजनाकरता पुरविण्यात आले आहे आणि सदर साहित्य डाऊनलोडींग, नक्कल, फेरफार, उत्पादन अथवा पुनरुत्पादन, वितरण, प्रक्षेपण, प्रसारण, प्रदर्शन, परवाना काढणे, भाषांतर, प्रकाशन, सादरिकरण अथवा इतर कुठल्याही माध्यमाचा वापर करून गैरफायदा घेणे यासाठी वापरले जाऊ शकत नाही. या वेबसाईटचे व साहित्यावरील सर्व व्यक्त, अव्यक्त अधिकार कांचन कराई यांनी राखून ठेवले आहेत.

५. जर हे नियम व प्रताधिकाराच्या सूचनांमधे परस्परविरोध आढळला तर प्रताधिकाराच्या सूचनांचे त्या परस्परविरोधावर नियंत्रण असेल.

६. जर कुणाकडून या नियमांचे पालन झाले नाही व आम्ही ताबडतोब कोणतीही कारवाई केली नाही तर याचा अर्थ आम्ही आमचे असलेले अधिकार (जसे की, भविष्यात संबंधित व्यक्तिवर कारवाई करणे) सोडून दिले आहेत, असा होत नाही.

७. जर एखादा विशिष्ट नियम अंमलात आणण्याजोगा नसेल, तर त्याचा परिणाम इतर नियमांवर होणार नाही.

८. वरील नियम हे मोगरा फुललाच्या केवळ लिंक्स फेसबूक किंवा ट्विटरसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर प्रकाशित करण्याला लागू होत नाहीत.

९. मोगरा फुललावरील साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी आमच्याशी संपर्क करा.

१०. या वापरण्याच्या नियमांमधे किंवा कुठल्याही एक नियमामधे, आमच्याकडून बदल, फेरबदल किंवा सुधारणा पूर्वसूचनेशिवाय केली जाऊ शकते आणि सदर बदल या ठिकाणी प्रकाशित केल्याबरोबर ताबडतोब लागू होतील. तरी आपण हे नियम वेळो-वेळी वाचत जावे. या नियमांमधील व बदलांमधील कोणताही मुद्दा आपल्याला अमान्य असल्यास, आपण ही साईट वापरणे बंद करावे. तसे न झाल्यास हे नियम व बदल आपल्याला मान्य आहेत असे समजण्यात येईल.

Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------