पान ७


रोज रात्री एक ते दीडचा सुमार ही देवदत्तांची घरी येण्याची वेळ ठरलेली होती. त्यांच्या नोकराला, हरीलाही त्यांची ही सवय माहीत झाली होती आणि आज पहाटेचे तीन वाजत आले तरी देवदत्तांचा पत्ता नव्हता. त्याने त्यांचा मोबाईल नंबर एक दोन वेळा ट्राय करून पाहीला पण तो बंद होता. हरीने 'यज्ञ'च्या ऑफीसमध्येही फोन करून पाहिला, तर नाईट अटेंडंटने सांगितलं की, "साहेब तर नेहमीप्रमाणे आठ वाजताच ऑफीसमधून बाहेर पडलेत."

मग मात्र हरीचं धाबं दणाणलं. धावत पळत तो दिनकररावांना उठवायला गेला."नाही, नको. तिथे आणखी निराळंच वळण लागेल. आपण असं करूया, तुला माहीत आहे ना, देव रोज संध्याकळी कुठे जातो ते?"." दिनकररावांनी विचारले

"हो" हरी म्हणाला.

"हं, मग जरा गाडी काढ. आपण त्या ठिकाणापर्यंत शोधून येऊ या. जर नाहीच सापडला तर मग पोलिसात जाण्याशिवाय गत्यंतर नाही." दिनकररावांच्या स्वरात चिंता डोकावत होती.

"काकासाहेब, शेखरसाहेबांना सोबत घेऊया का?" हरी.

"नको", दिनकरराव तुटकपणे म्हणाले, तसा हरी गाडी बाहेर काढण्यासाठी गॅरेजच्या दिशेने धावला.

Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------