पान ६
शेवटी व्हायचं होतं ते झालंच! शारादाच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी देवदत्तांनी, शेखरला बिझनेसमध्ये पार्टनर बनविण्याची गोष्ट, दिनकररावांच्या उपस्थितीत शेखराला बोलून दाखवली. शेखरचं छद्मी हास्य दिनकररावांना येणार्याच संकटाची चाहूल देत होतं पण परिस्थितीचा कौलच त्यांच्या बाजूने नव्हता. शारदाच्या अकाली मॄत्यूनंतर दारूने देवदत्तांना पूर्णत: अंकित केलं होतं, दिनकरराव वार्धक्याच्या छायेत वावरत होते. व्यवसाय सांभाळणारं दुसरं होतं कोण?
खुद्द दिनकररावंनाही वाटू लागलं होतं. तसं त्यांनी देवदत्तांना बोलूनही दाखवलं.
आपल्यावर असलेला शेखराचा राग निदान या निमित्ताने तरी कमी होईल, अशी आशा देवदत्तांनही वाटू लागली होती आणि तशातच ती घटना घडली...
...रोज रात्री दारू पिऊन, अडखळत का होईना पण घरीच येणारे देवदत्त, घरी आलेच नाहीत.