पान ४२


मोहिनी परदेशी गेल्याला आता एक आठवडा होऊन गेला होता. एका रात्री साधारण दहा-साडेदाच्या सुमारास देवदत्त, शेखर आणि दिनकरराव बंगल्य़ाच्या लॉनवर गप्पा मारत बसले होते. तेवढ्यात मोहिनीचा फ़ोन आला. ती पलिकडून उत्साहाने किलकिलत होती. देवदत्तही तिचं बोलणं मनापासून ऐकत होते. दिनकरराव आणि शेखर, देवदत्तांच्या चेहेर्‍यावरील हावभाव टिपत होते. काही वेळ मोहिनीसोबत बोलून देवदत्तांनी फ़ोन ठेवल्यावर दिनकररावांनी देवदत्तांना विचारलं, "काय रे, देव? ती मोहिनी कशी आहे?"

"अं...ठिक आहे. तिचाच फ़ोन होता. सध्या न्यूयॉर्कला गेली आहे. तिचे शोज असतात ना?" देवदत्त.

"असं, असं. बरं. देव, मी काय म्हणत होतो...बघ, म्हणजे तू ऐकून घे...उगाच गैरसमज करून घेऊ नकोस." दिनकरराव म्हणाले.

"काका, असं काय बोलताय? स्पष्ट विचारा ना!"

"मला माहितीयं, त्यांना काय बोलायचंय." शेखरने वडिलांच्या बाजूने बोलण्याचा प्रयत्न केला, "बाबांना हे सांगायचंय की मोहिनी तुझी खूप चांगली मैत्रीण आहे. तुलाही तिचा स्वभाव आवडतो. हे बघ, देव. वेळ कुणासाठी थांबून राहात नाही. शारदाची उणीव आपल्या सगळ्यांनाच भासत राहणार पण तू असं किती दिवस आयुष्य काढणार? तुलाही आयुष्याच्या वाटचालीसाठी कोणी जोडीदार नको का?"

"तुला काय म्हणायचंय, शेखर?" देवदत्त.

ओअॅसिस आहे, मोहिनी म्हणजे!.... ते मला असं गमवायचं नाही. शारदाला समजून घेण्यात मी ज्या चुका केल्या, त्या मला मोहिनीच्या बाबतीत करायच्या नाहीत. मला मोहिनीबद्द्ल काय वाटतं, हे मी वेळ आल्यावर मोहिनीला सांगेनही किंवा कदाचित तिला ते कधीही कळणार नाही पण एक मित्र म्हणून तिला माझ्याबद्दल जो आदर आहे, विश्‍वास आहे तो मला गमवायचा नाही."

शेखर, आई-वडील, बहीण-भाऊ हे आपल्याला ’मिळतात’ पण मित्र आपण ’बनवतो’.खरं ना?"

"यू आर राईट." शेखर हसून म्हणाला.

....तिकडे मोहिनी रंजनादेवींना सांगत होती, "ऐसी बात नही है, ताई. मी कदाचित देवसमोर माझ्या प्रेमाची कबूली देईनही पण त्याने गैरसमज करून घेतला तर? तो जर मला सोडून गेला तर? त्याच्या मनात माझ्याबद्दल खूप आदर आणि विश्‍वास आहे....मला तो गमवायचा नाहीये."----- समाप्त -----

----- या कथेवरील अभिप्राय / प्रतिक्रिया येथे नोंदवाव्यात. -----

Share this post:

1 comments

  1. Kanchan Karai // May 13, 2012 at 8:37 PM  

    ही कथा या ब्लॉगवर येथून पुन:प्रकाशित करण्यात आली आहे. या कथेवर पूर्वी मिळालेल्या प्रतिक्रिया येथे वाचता येतील.

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------