सर्व उपाय थकले की मनुष्य देवाच्या दारी धाव घेतो. शारदाही शेवटी माणूस होती. १० वर्षं अपत्यप्राप्तीसाठी निरनिराळे वैद्यकीय उपाय केल्यावर मुलासाठी तिने देवधर्माचा मार्ग चोखाळावा यात काही विशेष नव्हतं. तिच्या प्रेमाखातर देवदत्तांनी याही गोष्टीला मान्यता दिली होती पण मूल होण्यासाठी हे सर्व करणं त्यांना मनापासून पसंत नव्हतं. रोज संध्याकाळी देवळात जाऊन देवीला १०८ प्रदक्षिणा घातल्या व एक वेळ जेवलं तर वर्षभरात अपत्यप्राप्ती होईल, असं कुणा विभुतीच्या सांगण्यावरून शारदा रोज न चुकता देवळात जात असे. उपासाचा परिणाम तिच्या प्रकॄतीवरही झाला होता. मात्र तिचा निर्धार कायम होता

oasis story social dev sharda mohini publication accident wife husband fiancé dance love romance affection attraction family

"आज शारदाच्या व्रताचा शेवटचा दिवस. संध्याकाळी उद्यापन झालं की तिला सांगायचं,..." देवदत्तांच्या विचारांची तंद्री भंग पावली ती फोनच्या रिंगने. फोनवर त्यांनी जे काही ऐकलं ते त्यांना बाहेर धाव घेण्यासाठी पुरेसं होतं...

Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------