पान ३५


दुपारच्या साडेबारा-एकच्या दरम्यान देवदत्तांनी शेखरला आपल्या केबीनमध्ये बोलावून घेतलं.

"शेखर, मी काल काय सांगितलं, ते लक्षात आहे ना? ’हॉवर्ड आणि विल्सन’ तूच हॅन्डल करशील. त्यांच्याबरोबरच्या माझ्या मिटींगमध्ये..."

"पण देव, तुला असं नाही का वाटत की हा प्रोजेक्ट खूपच मोठा आहे माझ्यासाठी?" शेखरने विचारले.

देवदत्तांच्या चेहेर्‍यावर मंदस्मित तरळलं, "काल काका 'तसे' रिअॅक्ट झाले, म्हणून बोलतोयंस का तू?"

"नाही...तसं नाही..मलाच असं वाटतंय की तु पुन्हा विचार कर. हे फॉरिन कंपनीचं प्रोजेक्ट आहे ना?"

"मग? फॉरिन क्लायंटस काय आपण याच्याआधी हँडल केले नाहीत?"

"केले असतील रे, पण त्या ’आपण’मध्ये ’मी’ नव्हतो. तुझा तर प्रश्‍नच नाही. बिझनेसमध्ये आजपर्यंत तू कधीच फ़ेल झाला नाहीस, पण माझी ही पहिलीच वेळ आहे."

"कोणतीही गोष्ट माणूस कधीतरी पहिल्यांदा करतोच ना, शेखर. मी काय जन्मापासून बिझनेस करत होतो? तुझंच उदाहरण घे ना ...सहा-सात महिन्यांपूर्वी तु ’यज्ञ’ला जॉईन झालास... आज तुला सर्व माहीती आहेच ना. तुझ्यात जर हे प्रोजेक्ट सांभाळण्याचे पोटेन्शिअल्स नसते, तर मी तुला विचारलंच नसतं."

"तरीही मला वाटतं की तु पुन्हा एकदा विचार करावास, देव."त्यांच्या हातातून फ़ाईल घेताना शेखरला भास झाला की त्यांचे डोळे पाणावलेत. तो काही बोलला नाही. देवदत्तांनी त्याच्याशी हात मिळवून त्याला ’गुडलक’ विश केलं आणि शेखर त्यांच्या केबीनबाहेर पडला.

कामात व्यत्यय येऊ नये म्हणून देवदत्त आणि दिनकरराव ऑफ़िसमध्ये कधीच जेवत नसत पण आज देवदत्तांनी दिनकररावांना खास जेवणासाठी म्हणून थांबायला सांगितलं.

"आजपासून आपण एकत्र जेवायचं काका," देवदत्त म्हणाले.

"अरे पण मध्येच काम आलं तर कोणीतरी मोकळं हवं ना?"

"त्यासाठी एक आयडिया आहे माझ्याकडे. कधी आपण दोघं, कधी मी आणि शेखर, तर कधी तुम्ही आणि शेखर असं आपण...."

"ए बाबा, काय भलभलत्या कल्पना येतायेत तुझ्या डोक्यात? मी शेखरसोबत जेवायला बसू?"

"का नाही?"

"अरे पण..."

"काका, जबाबदारी पडली ना की शेखर ती बरोबर सांभाळतो, हे लक्षात आलंय माझ्या."

"खरं सांगू देव, माझ्याही ते लक्षात आलं होतं रे, पण म्ह्टलं तू काय बोलशील की आता मुलाची बाजू घेतात..."

Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------