पान ३१


"लग्न झाल्यापासून ऑफ़िसच्या कामात मी शारदाला इतकं इन्वॉल्व्ह करून घेतलं की एक स्त्री म्हणून तिच्या गरजा, आवडी-निवडी यांच्याकडे माझं कधी लक्षच गेलं नाही. अक्षरश: मला समर्पित झाल्यासारखी ती काम करायची पण स्वत:च्या आवडीनिवडींचा चुकूनसुद्धा उल्लेख नाही केला तिने. वेळ मिळाला तर, कधी कधी ती पेंटिंग करायची. फ़ार सुरेख फ़क्त ऐकत होती.

एक सुस्कारा सोडून देवदत्त म्हणाले, "माझी शारदा खूपच समजुतदार होती पण बिझनेसकडे लक्ष देण्याच्या नादात मी माझ्या शारदाला गमावून बसलो."

"ही अपराधीपणाची भावना तुझ्या मनात आहे म्हणून तू ड्रिंक्स घेतोस?" मोहिनीने शांतपणे विचारलं.

"हो... म्हणजे... घेत होतो", खाली मान घालत देवदत्त म्हणाले, "शारदा गेल्यानंतर सर्व भकास वाटायला लागलं होतं. मध्येच केव्हातरी तिचा भास व्हायचा आणि ती या जगात नाहीये, हे लक्षात आलं की आतून एकदम रिकामं रिकामं वाटायचं. ह्या फ़िलिंगपासून कशी सुटका करून घ्यावी तेच समजत नव्हतं, तेव्हा शेखरच्या आग्रहावरून मी एक-दोनदा ड्रिंक घेतलं. ते पोटात गेलं की एकदम निर्धास्त असल्यासारखं वाटायचं. नंतर त्याची सवय कधी झाली ते समजलंच नाही. त्या दिवशी तू घरी आली होतीस, तो माझा शेवटचा दिवस ड्रिंक्स

"त्यात त्याची काही चूक नाही, मोहिनी. तो मला काही जबरदस्तीने बारमध्ये घेऊन गेला नव्हता. खरंतर त्याचे आणि माझे संबंध लहानपणापासूनच थोडे ताणलेले होते. एकाच घरात राहूनही आम्ही एकमेकांना परके होतो. अशा परिस्थितीत तो स्वत:हून माझ्याजवळ येऊन माझी विचारपूस करत असेल, तर त्याला झटकणं योग्य दिसतं का?" देवदत्तांनी विचारलं.

देवदत्तांच्या या बोलण्यावर मोहिनी फ़क्त हुंकारली.

Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------