पान ३०


दोन क्षण देवदत्तांकडे रोखून पाहात मोहिनी म्हणाली, "देव, त्यादिवशी तू माझ्या अपार्टमेंटखाली नाही, हाय-वे च्या कडेला पडला होतास. दोन बदमाश तुझ्या शरीराची झडती घेत होते. माझी खरोखरंच फ़्लाईट होती त्या दिवशी आणि मी एअरपोर्टच्या दिशेने चालले होते. सुदैवाने माझ्या ड्रायव्हरचं तिकडे लक्ष गेलंस म्हणून..."

"व्हॉट?" देवदत्तांना अनपेक्षित धक्का बसला.

म्हणाले.

"कोणता प्रसंग?" मोहिनी.

देवदत्त सांगू लागले, "...शारदाचा अॅक्सिडेंट झाल्याचं कळल्यावर, मी त्या जागी पोहोचलो, तेव्हाचा तिचा चेहेरा मला विसरताच येत नाही...मी तिला धिर देत होतो...अॅंब्युलन्सच्या येण्याचीही वाट न पाहता, मी तिला गाडीत घालून हॉस्पिटलला नेलं होतं...स्ट्रेचरवर झोपलेली माझी शारदा माझा हात हातात घेऊन, काही न बोलता माझ्याकडे फ़क्त पाहात होती...एकटक...." दोन्ही हातांच्या ओंजळीत चेहेरा झाकून देवदत्तांनी आपले अश्रू लपविले.

तो प्रसंग ऐकून मोहिनीच्याही डोळ्यात पाणी आलं. ती काही न बोलता देवदत्तांच्या बाजूला, त्यांच्या रडण्याचा आवेग ओसरेपर्यंत बसून राहिली. थोडया वेळाने देवदत्त शांत झाले.

"तिला विसरणं माझ्यासाठी अशक्य आहे. माझी दहा वर्षांची सोबतीण, एका क्षणात माझ्यापासून दूर निघून गेली. पुन्हा कधीही परत न येण्यासाठी..." देवदत्तांनी एक सुस्कारा टाकला.

मोहिनी शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत होती.


मोहिनी, मला कधी कधी असं वाटतं, की तो अभागी संगीतकार जणू मीच आहे."

"का? असं का वाटतं तुला? शारदा गेली याच्यात तुझी चूक काय?" मोहिनीने प्रश्‍न केला.

Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------