मुलाखतीसाठी आलेल्या शारदाच्या उत्तरांनी आणि तिच्या शालीन सौंदर्याने दिनकरराव इतके भारवून गेले की 'सून असावी तर अशी', हा विचार त्यांच्या डोक्यात ठाम बसला. ती नोकरीसाठी आली आहे हे ते साफ विसरून गेले. अनाथाश्रमाच्या संचालकांकडे व बाहेर काही ठिकाणी तिची पूर्ण चौकशी केल्यानंतर त्यांची खात्री पटली की देवदत्तसाठी आपण निवडलेली मुलगी अगदी योग्य आहे. ही आपल्या अपरोक्ष केवळ व्यवसायच नाही तर देवदत्तलाही नीट सांभाळेल. एकदा खात्री पटल्यावर त्यांनी एका रात्री गप्पांच्या ओघात देवदत्तला शारदाची माहिती देऊन टाकली.

oasis story social dev sharda mohini publication accident wife husband fiancé dance love romance affection attraction family

आपल्या पत्नीच्या कर्तॄत्वाचा देवदत्तला अभिमान होता. पण वरुन प्रसन्न वाटणार्याn शारदेच्या मनाचा एक कोपरा मात्र दु:खाने काळवंडला होता. त्यांच्या लग्नाला दीड वर्ष होऊन गेलं तरीही तिची कूस रिकामीच होती. देवदत्तला काही विशेष वाटत नसे पण शारदा मात्र मातॄत्वाचा अनुभव घेण्यासाठी आसुसली होती. तिच्या समाधानाखातर तिने व देवदत्तने अनेक टेस्ट केल्या, उपाय केले पण या सर्वाची फल:श्रॄती एव्हढीच निघाली की दोघांच्यात काहीच दोष नाही व त्यांना केव्हाही मूल होऊ शकतं.


Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------