पान २५


"खरंच तुम्ही उगाच सांगितलंत, मला लगेच निघायचं होतं," देवदत्त म्हणाले.

"असं कसं? थंड घेतल्याशिवाय मी जाऊनच देणार नाही तुम्हाला." मोहिनी म्हणाली.

"ठिक आहे पण त्यादिवशी आमच्याकडे आल्यावर तुम्हीसुद्धा काही घेतलं नव्हतंत." देवदत्त म्हणाले.

"तेव्हा मी खूप घाईत होते हो, शिवाय ती वेळसुद्धा..." मोहिनीने आपलं वाक्य अर्धवटच सोडून दिलं.सीमाने टीपॉयवर ठेवलेल्या सरबतांच्या ग्लासापैकी एक ग्लास मोहिनीने देवदत्तांना दिला व दुसरा आपण घेतला.

देवदत्तांनी सहज विचारलं, "तुम्ही अॅक्ट्रेस आहत का?"

"नाही, डान्सर आहे मी. डान्सचे शोज् करते."

"ओह, आय सी. दॅट्‍स व्हेरी गुड!" देवदत्त उद्गारले.

"थँक्स अगेन..आणि तुम्ही..?" मोहिनीने विचारले.

"मी पब्लिशर आहे. यज्ञ प्रकाशन ही माझी पब्लिकेशन कंपनी आहे," देवदत्तांनी उत्तर दिले.

"अच्छा!" मोहिनीने मान डोलावली.

ज्या कारणामुळे देवदत्तांनी मोहिनीची भेट घेलली, ते कारणच असं होतं की त्या दोघांनाही फ़ार काही बोलता येत नव्हतं. मोहिनीचा निरोप घेऊन तिथून निघून जावं असं देवदत्तांना फ़ार वाटत होतं पण ते प्रशस्त दिसलं नसतं म्हणून ते सरबताचा एक-एक सिप घेत बसून राहिले. मोहिनीही त्यांचंच अनुकरण करत होती. थोडावेळ तिथे विचित्र शांतता पसली.

शेवटी देवदत्तांनीच तोंड उघडलं, "काय....क्लासिकल डान्स करता का तुम्ही?"

"हो," त्यांच्या प्रश्‍नाला उत्तर देत ती म्हणाली. "त्या शांततेचा भंग झाल्य़ामुळे तिलाही बरं वाटत होतं. तोच विषय कंटिन्यू करून ती म्हणाली. भरत नाट्यम् चे प्रोफ़ेशनल शोज करते मी. सध्यातरी भारतापुरतेच मर्यादित आहेत पण पुढच्या वर्षीपासून कदाचित मी परदेशीही जाईन.

"अरे वा! फ़ारच छान." बोलायला एक निराळाच विषय मिळाल्यावर, देवदत्तांनीही आपल्याला त्यात रस आहे असं दाखवायला सुरूवात केली.

Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------