पान २४


देवदत्तांनी आपली गाडी हाय-वे च्या दिशेने वळवली. उजव्या बाजूच्या वळणावरून पुढे जाताना, त्यांना ’ग्रीन टाऊन कॉम्प्लेक्स’चा मोठा बोर्ड दिसला. त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक, त्यांनी गाडी पुन्हा रिव्हर्समध्ये घेतली आणि ग्रीन टाऊन कॉम्प्लेक्सच्या दिशेने वळवली. ’बी विंग’ असं लिहिलेल्या बिल्डींगपाशी त्यांनी गाडी उभी केली. त्यांना गाडीतून उतरलेलं पाहताच, बिल्डिंगचा गुरखा आपल्या खुर्चित सरसावून बसला. देवदत्तांनी त्त्याला विचारलं, "वो फ्लॅट नंबर ४०२ में रहनेवाली नटराजन मॅडम आयी हैं क्या?"तेवढ्यात आतून आवाज आला, "कौन है सीमा?"

दारामागून बोलणार्‍या त्या स्त्रीने आतल्या दिशेने तोंड करून म्हटलं, "जी, एक साहब आपसे मिलना चाह्ते है."

त्या स्त्रीचं बोलून संपलं तोच चट्‍चट्‍ असा सपातांचा आवाज करीत मोहिनी दरवाजाजवळ आली आणि तिने म्हटलं, "सीमा तुम जाओ," त्यासरशी सीमा नावाची ती स्त्री आत निघून गेली आणि मोहिनीने दरवाजा उघडला.

"तुम्ही मिस मोहिनी नटराजन का?" देवदत्तांनी विचारलं.मोहिनी म्हणाली, "मी असं करते, सीमाला सरबत बनवायला सांगते.." देवदत्त पुढे काहीतरी बोलणार होते पण त्यांना बोलू न देता मोहिनीने सीमाला दोन ग्लास सरबत आणण्याची सूचना केलीसुद्धा!

Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------