पान २३


"हे.." गुलाबी वेष्ट्नामधला बॉक्स तिच्यासमोर नाचवत ते म्हणाले.

"ओह नो, कसा शोधून काढलात? मी स्वत: देणार होते तुम्हाला.." शारदा हिरमुसून बोलली

शारदाने देवदत्तांसाठी आणलेलं गिफ़्ट देवदत्तांच्या हाती लागलं होतं. लग्नाचा पहिला वाढदिवस म्हणून आज ते बाहेर फ़िरायला जाणार होते. त्यावेळेस देवदत्तांना हे गिफ़्ट द्‍यायचं, असं शारदाने ठरवलं होतं पण देवद्तांच्या हाती आधीच ते गिफ़्ट लागल्याने तिला आता ते सरप्राईज देता येणार नव्हतं.

"टू माय लव्हिंग हजबंड....हं.." देवदत्त बॉक्सवरच्या गिफ़्ट कार्ड्वर लिहिलेली ओळ वाचून म्हणाले. तेवढ्यात शारदाने त्यांच्या हातातून तो बॉक्स काढून घेतला.

"अरे, पाहू दे ना."

"नाही, आता नाही. संध्याकाळी," शारदा नाराजीच्या सुरात म्हणाली.

"मग आता काय..?" तिला आपल्या जवळ पुन्हा ओढत देवदत्त मिस्किल स्वरात विचारत होते.

त्यांचा स्वर ओळखून दटावणीच्या सुरात ती म्हणाली, "आता काही नाही, आता फ़क्त ऑफ़ीस..."

"नाही पण मी काय म्हणतो...."

त्यांना पुढे बोलू न देता शारदा आपला हात सोडवून लांब पळाली.

"अगं.., शारदा, थांब..."

...आपल्याच ओरडण्याच्या आवाजाने देवदत्त जागे आले. शारदाच्या आठवणींमध्ये रमता रमता केव्हातरी त्यांचा डोळा लागला होता. त्यांना पूर्ण जाग आली आणि ते बेडवर उठून

तयार होऊन ते गाडीपाशी आले तेव्हा, हरी गाडीची चावी हातात घेऊन त्यांची वाट पाहात उभा होता.

Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------