पान २२


ऑफिसला न जाता घरी आराम करणे, हे देवदत्तांच्या स्वभावातच नव्हतं पण गेल्या वर्षभरापेक्षा जास्त काळ त्यांचं ऑफिसकडे दुर्लक्ष झालं होतं खरं. आता मात्र निराळ्याच कारणासाठी त्यांनी आठवडाभर घरी राहायचं ठरवलं होतं. दिनकररावही त्यांना काहीच बोलले नाहीत. देवदत्त कोणत्या कारणासाठी घरी राहात आहेत, याची त्यांना अंधुकशी कल्पना होती. डॉ. बर्व्यांना भेटून आल्यावर आपण आठवड्याभराच्या रजेवर जात असल्याचं त्यांनी ऑफ़िसमध्ये डिक्लेअर केलं आणि शेखरला आगीत तेल ओतल्यासारखं झालं.


...त्यांच्या लग्नाचा पहिलाच वाढदिवस होता तो...

देवदत्तांनी शारदाला मिठीत घेऊन हलकेच तिच्या ओठांवर आपले ओठ टेकत तिला विचारलं, "बोल, तुला काय गिफ्ट हवं?"

"गिफ्ट काय असं मागून घ्यायचं असतं का?"

"अगं पण तुला काय हवंय हे मला कसं कळणार, तू सांगितल्याशिवाय?"

"काही गोष्टी न सांगताच समजून घ्यायच्या असतात, मिस्टर.." शारदाने डोळे बारीक करत, मान डोलावून चिडवून म्हटले.

"ए, मी मनकवडा वगैरे नाही. तुला काय हवंय हे जर मला तू सांगितलं नाहीस, तर मी मला हवं ते घेऊन येईन आणि मग ते तुला घ्यावं लागेल."


"नाही कसं? एक गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवलीस. मला माहीत आहे....." देवदत्त एकदम गंभीर होऊन बोलत होते.

"कोणती गोष्ट? काय लपवलं मी?" शारदा मनापासून विचारत होती.

Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------