पान २०


देवदत्तांनी इंटरकॉमवर दिनकररावांच्या एक्स्टेंशनचा नंबर डायल केला.

"हां बोल देव," पलिकडून दिनकररावांचा आवाज आला.

"काका, त्या बाई...... मोहिनी नटराज, ग्रीन टाऊन कॉम्प्लेक्समध्येच राहतात ना?"

"कोण मोहिनी नटराजन?"

"च्... काका, अहो असं काय करता? त्या दिवशी रात्री, त्या बाई मला घरी सोडायला आल्या होत्या त्या.. त्यांचं नाव मोहिनी नटराजनच ना?""हं, तसंही असेल कदाचित. तुम्हाला काही फ़ोन नंबर वगैरे दिला होता का त्यांनी....अं...नाही? ठीक आहे. मी पुन्हा चार-पाच दिवसांनी एक चक्कर टाकून पाहीन." देवदत्त म्हणाले आणि त्यांनी इंटरकॉम डिसकनेक्ट केला. तेवढ्यात त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी आली. टेबलावर डोकं ठेवून ते पाच मिनिटं पडून राहिले पण त्यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं. जीव घुसमटतोय, हातपाय कापतायत अशी भावना होऊ लागली होती. केबीनमध्ये असलेल्या छॊट्याश्या फ़्रिजमधली थंड पाण्याची बाटली काढून, त्यांनी ती झट्कन तोंडाला लावली. घशातून गटगट आवाज करत, गार पाणी पोटात जाताना त्यांना फ़ार बरं वाटत होतं. साधारण पाच-एक मिनिटं त्यांना बरं वाटलं असेल तोच त्यांना पोटातून प्रचंड ढवळून आलं. केबीनला अटॅच्ड असलेल्या टॉयलेटमध्ये त्यांनी धाव घेतली आणि बेसिनसमोर ओणवं झाल्याबरोबर त्यांच्या पोटात असेल, नसेल ते सर्व बाहेर पडलं. तोंड
"ओ.के. सर. प्लीज टेक केअर ऑफ़ युवरसेल्फ़."

तिच्या या बोलण्यावर देवदत्तांनी फ़क्त डोळ्याने होकारार्थी खूण करून तिचा निरोप घेतला आणि शोना केबीनबाहेर गेल्यावार त्यांनी आपला लॅपटॉप बंद केला. पुन्हा एकदा गार पाणी प्यावसं त्यांना फ़ार वाटत होतं पण काही वेळापूर्वीचा प्रसंग आठवून त्यांनी फ़्रिजमधून काढलेली बाटली पुन्हा आत ठेवली. टेबलावरचे काही महत्त्वाचे कागदपत्र आपल्या ब्रिफ़केसमध्ये सारले आणि ब्रिफ़केस बंद करून ते बाहेर पडले.

ऑफ़िसच्या बाहेर ड्रायव्हर त्यांच्या येण्याचीच वाट पाहत होता. मागच्या सीटवर बसून, दरवाजा ओढून ते म्हणाले, "डॉक्टर बर्व्यांकडे घे."

Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------