पान १९
देवदत्ताने कर्तॄत्वाची जी उंची गाठली ती आपण कधीच गाठू शकणार नाही, याची शेखरला कल्पना होतीच पण बापाच्या आणि चुलतभावाच्या भागिदारीच्या धंदयात आपल्याला ताटाखालचं मांजर बनून राहावं लागेल, ही कल्पनाही शेखरला भयावह वाटत असे आणि जेव्हा भितीचं हे पांघरूण झुगारून त्याने खरोखरच बिझनेसमध्ये लक्ष देण्याचं ठरवलं, तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. त्याच्या बाहेरच्या भानगडी त्याला फ़ार महागात गेल्या होत्या. बिझनेसची सूत्र शारदाच्या हातात आली होती आणि ती गेल्यावरही बिझनेस सांभाळण्याचा जो पर्याय त्याला मिळाला होता तो काही फ़ार सन्मानजनक नव्हता.

त्या रात्री शेखरचं आणि शालिनीचं या विषयावर बोलणं सुरु असतानाच देवदत्त आपल्या बेडरूममध्ये विचार करत होते, "आपल्याला सुखरूप घरी आणून सोडणार्या त्या मोहिनी नटराजनचे एकदा भेटून आभार मानले पाहिजेत. काय बरं पत्ता तिचा..? हं! ४०२, बी विंग, ग्रीन टाऊन कॉम्प्लेक्स..."