पान १८


पण त्या दिवशी शेखरला वाटलं की आपल्यापेक्षा देवदत्तच्या गरजा पुरवणं, हे आई-बाबांना जास्त महत्त्वाचं वाटतं. देवदत्त अभ्यासातही हुशार होता. त्याचं उदाहरण देऊन बर्‍याचदा शाळेतील शिक्षकदेखील शेखरची कानउघडणी करीत असत. कळत नकळत शेखरची तुलना देवदत्तशी होतच असे. या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून शेखर देवदत्तचा राग-राग करू लागला होता. पण देवदत्ताच्या उजळ कर्तॄत्वापुढे शेखरचा त्रागा कोणाच्या लक्षातच आला नाही. तो वाळीत टाकल्यातच जमा होता. नाही म्हणायला शेखरला आठवीच्या वर्गात होती, "जेव्हापासून हा देवदत्त मॅट्रीक पास झालाय, बाबा तर त्याचे आणखीनच लाड करू लागलेत. आपल्याशी बोलायलाही बाबांना वेळ नसतो पण त्याच्यासाठी मात्र..." शेखरचे डोळे पटकन भरून आले होते.

राकेशच्या वडिलांच्या ते लक्षात आलं. त्यांनी विचारलं, "का रे बाळ, काय झालं?"

"काही नाही," डोळ्यातलं पाणी शर्टाच्या बाहीला पुसत शेखर म्हणाला आणि राकेशला व त्याच्या वडिलांना अच्छाही न करता, आपलं दप्तर सावरत तो घराच्या बाहेर पडला. त्यादिवशी शेखरने दिनकररावांकडून घरी उशीरा येण्याबद्दल मार खाल्ला होता.त्यानंतर जवळजवळ रोजच शेखर राकेशसोबत संध्याकाळी त्याच्या घरी जात असे. "राकेशसोबत अभ्यास करतो," हे कारण त्याने घरी उशीरा येण्यासाठी तयार करून ठेवलं होतं. त्याच्या वार्षिक परिक्षेचा निकाल फारसा आशाजनक नव्हता पण "पास तर झाला ना, पुढच्या वर्षी करेल जास्त अभ्यास," या मालतीबाईंच्या वाक्यापुढे दिनकररा्वांनी काहीच भाष्य केलं नाही. पुढची दोनही वर्षं शेखर जेमतेम मार्कांनी पास झाला शेखरच्या राकेशच्या घरी अभ्यासाला जाण्याचा किती उपयोग झाला होता, ते त्याचं त्यालाच ठाऊक पण शेखरमध्ये झालेला बदल त्याच्या वागण्याबोलण्यातून दिसू लागला होता; पूर्वी राग आला तरी गप्प बसणारा शेखर आता राग आल्यावर उलटून बोलून दाखवत होता. देवदत्त त्याचं मुख्य टार्गेट होतं.

Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------