पान १७


"त्या शारदाच्या सोबत हा देवदत्तसुद्धा मेला असता ना, तर बरं झालं असतं," पाचवा पेग पोटात गेला आणि शेखरचा देवदत्तांवरचा राग अनावर झाला, "अरे, काय नाही केलं, हे सर्व मिळवण्यासाठी. आमचा बाप तो तसा. स्वत:च्याच घरात आश्रितासारखे दिवस काढायला लावले. त्या शारदाने पै-पै ला महाग केलं मला. शेवटी माझा पोटचा पोरगा तिला देण्याची वेळ आली तरी ही बाई काही बधली नाही. ती मेली तर म्हटलं, चला सुटलो! निदान आहेत," शालिनी म्हणाली.

"हं, म्हणूनच गप्प बसलोय." शेखर.

"मी तर म्हणते, काय वाईट आहे, सांग? तुला हवी तशी बिझनेसमध्ये पार्टनरशिप मिळतेय, तर तुला हवीत कशाला बाहेरची लफडी-कुलंगडी?"

शालिनीच्या या प्रश्नावर शेखरने काहीच उत्तर दिले नाही. तो नुसताच टी-पॉयवर ठेवलेल्या ग्लासाकडे पाहात बसला. त्याला तो प्रसंग आठवला...

शेखर पाच वर्षांचा असेल. मालतीबाई त्याला जेवायला वाढत होत्या. तेवढ्यात देवदत्त शाळेतून आला. त्याच्या पायाला ठेच लागली होती. त्याचा भळभळणारा अंगठा पाहून मालतीबाई हातातलं पातेलं टाकून औषध घ्यायला धावल्या. पुढचा अर्धा तास शेखर पानावर तिष्ठत बसून होता पण देवदत्ताच्या जखमेवर मलमपट्टी होईपर्यंत त्याला जेवण मिळालं नाही. तसाच आणखी एक प्रसंग- दिनकरराव संध्याकाळी घरी येताना दिसले की शेखर घराच्या दारामागे उभा राहून त्यांच्या घरात येण्याची वाट पाहात असे. ते घरात आले की तो पट्कन दाराच्या मागून बाहेर येत त्यांना भो: करून दचकवत असे. दिनकररावही दचकल्याचं नाटक करून मग त्याला प्रेमाने जवळ घेऊन त्याचा गालगुच्चा घेत असत. एकदा तो असाच नेहमीप्रमाणे दाराच्यामागे लपला असताना, बराच वेळ झाला तरी दिनकरराव आलेच नाहीत. "कुठे राहिले आपले बाबा?" म्हणून तो बघायला बाहेर वाकला, तर घरासमोरच्या झाडाच्या पारावर दिनकरराव आणि देवदत्त बसले होते. दिनकररावांनी प्रेमाने त्याला जवळ घेतलं होतं आणि ते त्याच्या हातात काहीतरी वस्तू देत होते. त्यांनी काय दिलं ते शेखरला शेवटपर्यंत कळलं नाही.

Share this post:

------------------------------------------------------------------------
आपल्या प्रतिक्रिया, सूचना व सल्ले कृपया येथे पोस्ट करावेत.


Please post your comment, advice and suggestions here.


Read our Blog Comment Policy.
------------------------------------------------------------------------