पान १५
शेखरकडे पाहण्याची दिनकररावांची दॄष्टी कदाचित बदललीही असती पण जे देवदत्तने करून दाखवलं तेच करून दाखविण्याची पुरेपुर संधी शेखरलाही उपलब्ध होती. किंबहुना, एक एस्टॅब्लिश्ड पब्लिकेशन कंपनी त्याची वाट पाहत उभी असतानाही, शेखर मात्र त्याच्या व्यसनांमध्ये आणि लफ़ड्यांमध्येच गुंग होता. त्याच्यासमॊर भागिदारीचा प्रस्ताव, केवळ दिनकररावांनीच नाही, तर देवदत्तांनीही ठेवला होता पण "स्वतंत्र व्यवसाय करायचाय," असं कारण सांगून त्याने कित्येकदा वेळ मारून नेली मात्र त्या प्रत्येक वेळेस, त्याच्या स्वतंत्र धंदयासाठी लागणारं ’भांडवल’ तो दिनकरराव आणि देवदतांकडून घ्यायला विसरला नव्हता.
करत असे.
शारदा आणि देवदत्तांच्या आयुष्यातील एक अपत्याची उणीव सोडली तर सर्व काही सुरळीत सुरू होतं. पण शारदेची ही दुखरी नस शेखरने बरोबर ओळखली होती. संधी मिळताच त्याने, आपल्या मुलाला म्हणजे सुयोगला देवदत्त आणि शारदाला दत्तक देण्याचीही तयारी असल्य़ाचं भासवलं. उद्देश हा की निदान ह्या निमित्ताने घरात येणार्या पैशावर तरी आपल्याला हक्क सांगता येईल.